Pet Waste : मुंबईत आता पाळीव प्राण्यांची विष्ठाही महापालिका करणार जमा

49
Pet Waste : मुंबईत आता पाळीव प्राण्यांची विष्ठाही महापालिका करणार जमा
Pet Waste : मुंबईत आता पाळीव प्राण्यांची विष्ठाही महापालिका करणार जमा
  • मुंबई (विशेष प्रतिनिधी)

वापरलेले सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधी आदींच्या संकलनासाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलन सेवेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या अंतर्गत ३ मे २०२५ पासून पाळीव प्राण्यांची विष्ठा आणि इतर विशेष कचऱ्याच्या संकलनाची सेवा सुरू करण्यात आली आहे. तर सोमवार, ५ मे २०२५ पासून ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र सेवा देखील सुरू करण्यात येत आहे. (Pet Waste)

मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Ashwini Joshi) यांच्या मार्गदर्शनात आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. निरनिराळे उपक्रमही राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या वैयक्तिक वापराशी संबंधित कचरा संकलनाच्या उद्देशाने ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डॉमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) ही सेवा २२ एप्रिल २०२५ पासून.सुरू करण्यात आली आहे. या सेवेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. (Pet Waste)

(हेही वाचा – Israel Airport : तेल अवीवकरिता जाणारी एअर इंडियाची उड्डाणे पुढील दोन दिवस स्थगित)

या उपक्रमाबाबत उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर (Kiran Dighavkar) यांनी सांगितले की, मुंबईत सध्या दररोज सुमारे ७ ते ८ दशलक्ष टन घनकचरा निर्माण होतो. या कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनाची गरज ओळखून मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दिनांक २२ एप्रिल २०२५ पासून ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) सेवा सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत दिनांक २ मे २०२५ पर्यंत या सेवेसाठी एकूण ३०७ नोंदणी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये १४८ गृहनिर्माण संस्था, १३५ श्रृंगार केंद्र (Beauty parlour), १७ शैक्षणिक संस्था आणि ७ महिला वसतिगृहांचा समावेश आहे. (Pet Waste)

ही सेवा सुरू झाल्यानंतर मिळालेला प्रतिसाद, प्राप्त सूचना आणि नागरिकांच्या विनंतीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पाळीव प्राण्यांच्या विष्ठेचे संकलन देखील या सेवेद्वारे करण्यात येणार आहे. ही सुविधा आज दिनांक ३ मे २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Haji Ali Pumping Station चे पंप खराब, तब्बल २७८ कोटी रुपये केले जाणार खर्च)

‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ साठी यापूर्वीच ऑनलाईन लिंक आणि क्यू आर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्येच पाळीव प्राणी विष्ठा संकलन सुविधेसाठी नोंदणी करता येईल.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc6zR8XHoOzXRNanCCdj4oKtS27Iu7vuaXBANiCGoKCfUCn5g/viewform या लिंकवर जाऊन किंवा विविध ठिकाणी उपलब्ध तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) समाज खात्यावर प्रसिद्ध करण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅन करून ही नोंदणी करता येईल.

ई-कचरा संकलन सेवाही उपलब्ध

मुंबईमध्ये वीजकीय (Electronic) उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात ई-कचरा तयार होतो. या धोकादायक स्वरूपाच्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे व पुनर्प्रक्रिया तसेच पुनर्वापर करणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून महानगरपालिकेकडून सोमवार, ५ मे २०२५ पासून स्वतंत्र ई-कचरा संकलन सेवा सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत निरुपयोगी मोबाईल फोन, चार्जर, बॅटरी, संगणक, दूरचित्रवाणी संच आणि लहान उपकरणांसारख्या तत्सम सर्व ई-कचऱ्याचे संकलन केले जाईल. (Pet Waste)

(हेही वाचा – राज्यमंत्री Yogesh Kadam यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश)

ई-कचरा संकलनासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSemTxY-ifCjxU7VW-U7sYpr8JOD_Zj4XKnDB7uVpJyXsk6LxA/viewform?usp=header ही स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावर किंवा ई कचरा संकलनासाठी तयार करण्यात आलेले स्वतंत्र
क्यूआर कोड स्कॅन करून या सुविधेसाठी नोंदणी करता येईल. विविध ठिकाणी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) समाज माध्यम खात्यावर हे क्यू आर कोड प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

ई-कचरा सर्वसाधारण कचऱ्यात मिसळल्यामुळे त्यातील शिसे (Lead), पारा (Mercury), कॅडमियम यांसारख्या विषारी घटकांमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ई-कचरा संकलन सेवा सुरू करण्यात येत आहे. ई-कचऱ्याची योग्य पद्धतीने, सुलभ व पर्यावरणस्नेही पद्धतीने विल्हेवाट लावता यावी, हा या सेवेमागचा उद्देश आहे. (Pet Waste)

याच पार्श्वभूमीवर, ई-कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट, त्याचे पर्यावरणीय परिणाम आणि नागरिकांचा सहभाग यावर भर देणारे जनजागृती अभियान देखील महानगरपालिकेकडून राबवले जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन अधिक उत्तरदायित्वपूर्ण करण्याच्या अनुषंगाने ही सेवा एक महत्वपूर्ण पाऊल आहे. पर्यावरण रक्षण, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे आणि सन्मानाचे संरक्षण तसेच सार्वजनिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात येत आहे. (Pet Waste)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.