India-Pakistan War : युद्ध झाल्यास चार दिवसही भारतासमोर टिकू शकत नाही पाकिस्तान !

India-Pakistan War : युद्ध झाल्यास चार दिवसही भारतासमोर टिकू शकत नाही पाकिस्तान !

110
India-Pakistan War : युद्ध झाल्यास चार दिवसही भारतासमोर टिकू शकत नाही पाकिस्तान !
India-Pakistan War : युद्ध झाल्यास चार दिवसही भारतासमोर टिकू शकत नाही पाकिस्तान !

भारत आणि पाकिस्तानमध्ये (India-Pakistan War) तणावाची स्थिती कायम आहे. भारताला इशारा देण्यासाठी पाकिस्तान क्षेपणास्त्र चाचण्या करुन त्यांचे सैन्य मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र प्रत्यक्षात जर भारताबरोबर युद्ध झाल्यास चार दिवस टिकून राहण्यासाठीही पाकिस्तानकडे पुरेसा दारूगोळा शिल्लक नाही. युद्ध झाल्यास पाकिस्तान चार दिवसात भारतासमोर गुडघे टेकेल अशी परिस्थिती असल्याची माहिती एका गुप्तचर अहवालातून समोर आली आहे. (India-Pakistan War)

हेही वाचा-India-Pakistan War : पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक ! वायू सेनेची संवेदनशील माहिती आणि फोटो सापडले …

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र अनेक अहवालांमध्ये असा दावा केला जातोय की, जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर पाकिस्तान भारताविरुद्ध जास्त काळ टिकू शकणार नाही. विशेष म्हणजे पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनीही हे मान्य केले आहे. पाकिस्तानकडे आता युद्ध लढण्यासाठी फक्त चार दिवसांचा दारूगोळा शिल्लक आहे. युक्रेन आणि इस्रायलला मोठ्या प्रमाणात दारूगोळा पुरवल्यामुळे पाकिस्तानवर हे संकट उद्भवले आहे. (India-Pakistan War)

हेही वाचा- India-Pakistan War : पाकमध्ये ‘डर का माहौल’ ! पीओकेमध्ये पाकिस्तानी सैन्याने बनवले बंकर, वॉर सायरन आणि लोकांना घरे खाली करण्याचे आदेश

२०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने शस्त्रास्त्र निर्यातीचा मार्ग निवडला होता. पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीने लाखो तोफखाना, रॉकेट आणि लहान शस्त्रे युक्रेनला पाठवली होती. फेब्रुवारी आणि मार्च २०२३ मध्येच ४२,००० बीएम-२१ रॉकेट, ६०,००० १५५ मिमी हॉवित्झर शेल आणि १,३०,००० इतर रॉकेट निर्यात करण्यात आले. यातून पाकिस्तानने सुमारे ३६४ दशलक्ष डॉलर्स कमावले, ज्याचा मोठा भाग लष्कराच्या मुख्यालयाला मिळाला होता. (India-Pakistan War)

हेही वाचा- Made in India iPhone : अमेरिकेत वापरले जाणारे ५० टक्के आयफोन भारतात बनलेले – टीम कूक

पाकिस्तानी सैन्याला आता १५५ मिमी तोफखान्यांच्या तीव्र कमतरतेचा सामना करावा लागत आहे. पुरेशा दारूगोळ्याशिवाय एसएच-१५ सारख्या माउंटेड गन सिस्टीम निरुपयोगी ठरत आहेत. आर्थिक फायद्यासाठी पाकिस्तानने युक्रेन आणि इस्रायलला मोठ्या प्रमाणात तोफखाना दारूगोळा निर्यात केला. त्यामुळे सध्याच्या साठ्यातून पाकिस्तान फक्त ४ दिवस युद्ध लढू शकेल. दुसरीकडे, आर्थिक मंदी, महागाई आणि इंधन टंचाईमुळे लष्कराला सराव थांबवावा लागला आहे. (India-Pakistan War)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.