देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट यूजी 2025 (NEET UG exam) ४ मे रोजी होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीए २०१९ पासून ही परीक्षा घेत आहे. यावेळी, आतापर्यंत सर्वाधिक एनईईटी परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. यंदा परीक्षेसाठी ५ हजार ५०० केंद्रे ठरवण्यात आली आहेत. शहरांबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी NEET परीक्षा ५७१ शहरांमधील (१४ परदेशी शहरे) ४ हजार ७५० केंद्रांवर घेण्यात आली होती. यावेळी, NEET परीक्षा देशातील ५५२ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये घेतली जाईल. (NEET UG exam)
हेही वाचा-India VS Pakistan War : राजस्थानमधून घुसखोरी करणारा पाकिस्तानी रेंजर BSF च्या ताब्यात !
नीट-यूजी-२०२५ परीक्षा दुपारी २ ते ५ दरम्यान होणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यास परीक्षा केंद्रांवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विशेष उपाययोजना केल्या आहेत. यात कायदेशीर कारवाईसह संबंधितास परीक्षेस बसण्यावर तीन वर्षांसाठी बंदीच्या शिक्षेचा समावेश आहे. नीट-यूजी परीक्षेत २०२४मध्ये झालेल्या गैरप्रकाराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यामुळे यंदा प्रचंड काळजी घेण्यात आली असून नियमही अधिक कडक करण्यात आले आहेत. (NEET UG exam)
हेही वाचा- Nashik Kumbh Mela : रेल्वे प्रशासनाची समन्वय बैठक; ‘या’ महत्त्वपूर्ण विषयांवर झाली चर्चा
यंदा बहुतांश परीक्षा केंद्र सरकारी किंवा अनुदानित शाळा-कॉलेजमध्ये देण्यात आले आहेत. गैरप्रकार केल्याचे उघड झाल्यास संबंधितावर तीन वर्षांसाठी बंदी घातली जाईल. शिवाय या अयोग्य साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालणारा कायदा-२०२४नुसार कारवाई केली जाणार आहे. (NEET UG exam)
हेही वाचा- MegaBlock : रविवारी ‘या’ मार्गावरचा ब्लॉक रद्द ; काय आहे कारण घ्या जाणून …
यंदा परीक्षा सुरळित पार पाडण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा सराव शनिवारी करण्यात आला. मोबाइल सिग्नल जामरची कार्यक्षमता, मनुष्यबळाची उपलब्धता आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रक्रियेची सुसुत्रता याचा सराव केला गेला. (NEET UG exam)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community