IPL 2025 : यंदाच्या मोसमात ‘हा’ संघ विजेतेपद पटकवणार; सुनील गावस्करांच भाकीत खरं ठरणार?

आयपीएल २०२५(IPL 2025)चा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून गुणतालिकेत अव्वल राहण्याकरिता संघांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. अशातच माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी अंदाज व्यक्त केला.

114

आयपीएल २०२५(IPL 2025)चा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून गुणतालिकेत अव्वल राहण्याकरिता संघांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. अशातच माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी अंदाज व्यक्त केला. यंदाच्या आयपीएल(IPL 2025) मोसमात कुठला संघ विजेतेपद पटकाविणार याबाबत गावस्करांचं भाकीत खरं ठरणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सुनील गावस्कर म्हणाले, “रॉयल चॅलेंजर्स बँगलोर(आरसीबी)ने संपूर्ण हंगामात अत्यंत प्रभावी फलंदाजी केली आहे. यासोबतच त्यांच्या क्षेत्ररक्षणातील सातत्य देखील उल्लेखनीय आहे, असे मत गावस्करांनी मांडले आहे.

(हेही वाचा Virat Kohli : विराट कोहलीने टी-२० क्रिकेट का सोडलं; यावर पहिल्यांदाच केलं उघड भाष्य )

सुनील गावस्कर पुढे म्हणाले, आरसीबी संघातील विराट कोहली, देवदत्त पडिकल, टीम डेविड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूड या खेळाडूंनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही ते म्हणाले. यावरून गावस्करांनी स्पष्ट अंदाज वर्तवित आरसीबी संघाला यंदाच्या हंगामातील विजेतेपदासाठी सर्वात प्रबळ दावेदार ठरविले आहे. विशेष म्हणजे, आरसीबीने मागील काही हंगामांमध्ये चांगली सुरुवात करूनही अंतिम फेरी गाठण्यात अपयश अनुभवले आहे. मात्र यंदा(IPL 2025) त्यांच्या कामगिरीत सुधारणा आणि संघ अधिक सुसंगत, आत्मविश्वासपूर्ण वाटतो आहे.

सुनील गावसकरांच्या मते, आरसीबीकडून फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात कमालीची कामगिरी करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामा(IPL 2025)त संघाने अपवादात्मक कामगिरी केली असून १० सामन्यांमध्ये ०७ विजय मिळवत पॉईंट्स टेबलमध्ये १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर असलेला हा संघ ट्रॉफी उचलण्याच्या शर्यतीत इतरांपेक्षा काही पावलं पुढे आहे, असं मतदेखील गावस्करांनी व्यक्त केले. (IPL 2025)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.