आंबिवलीतील इराणी वाडीतील ‘लेडी डॉन’ Fiza Irani गजाआड

81
आंबिवलीतील इराणी वाडीतील 'लेडी डॉन' Fiza Irani गजाआड
  • प्रतिनिधी 

बोल बच्चन गिरी करून फसवणूक करणाऱ्या टोळ्या, सोनसाखळी चोरणाऱ्या टोळ्यांमुळे बदनाम झालेल्या कल्याण तालुक्यातील आंबिवली इराणी वाडीतील कुप्रसिद्ध ‘लेडी डॉन’ फिजा इराणीला (Fiza Irani) पोलीस उपायुक्ताच्या विशेष पथकाने अमली पदार्थ विक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या फिजा इराणी कडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात एमडी हा अमली पदार्थ जप्त केला असून तिच्या टोळीतील इतर सदस्य अटकेच्या भीतीने भूमिगत (अंडरग्रांउड) झाले आहे. त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.

फिजा इराणी (Fiza Irani) ही कल्याण तालुक्यातील आंबिवली येथील इराणी वाडीत राहण्यास आहे, तिच्यावर ठाणे जिल्ह्यात विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. इराणी वाडीतील सोनसाखळी चोर, बोल बच्चन गिरी करणाऱ्या टोळ्यांनी फसवणूक करून आणलेले तसेच जबरी चोरीतील सोन्याची विल्हेवाट लावण्यात फिजा इराणी या टोळ्यांना सुरुवातीला मदत करीत होती. त्यानंतर तिने इराणीवाडीत महिलांची टोळी तयार केली.

(हेही वाचा – Fraud : वाहन भाडेतत्त्वावर देण्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून १,३७५ जणांची फसवणूक; दोघांना अटक)

फिजा इराणी (Fiza Irani) आणि तिची महिला टोळी तसेच अल्पवयीन मुलांच्या टोळी इराणी वाडीत राहणाऱ्या सोनसाखळी चोर तसेच इतर गुन्हेगारांना पोलिसांपासून संरक्षण देत होत्या. गुन्हेगारांना अटक करण्यासाठी आलेलल्या पोलिसांवर फिजा आणि तिच्या टोळ्या तुटून पडायच्या. पोलिसांवर हल्ला करणे, पोलिसांच्या अंगावर येऊन गुन्हेगारांना पळवून लावणे या प्रकारचे अनेक गुन्हे फिजा इराणीवर संबंधित पोलीस ठाण्यात दाखल आहेत. फिजाला इराणी वाडीतील ‘लेडी डॉन’ म्हणून ओळखले जात होते.

पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ च्या पथकाने फिजा इराणी ला दोन दिवसांपूर्वी अमली पदार्थांची विक्री करताना इराणी वाडी जवळून अटक करण्यात आली. पोलिसांनी एक लाख १६ हजार रूपयांची मफेड्रोन पावडर (एम. डी.) जप्त केली आहे. तस्करी, सरकारी कामात अडथळा आणि अनेक गुन्ह्यांप्रकरणी फिजा इराणीवर (Fiza Irani) कोळसेवाडी, खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.