भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी पत्रकाराचं विधान सध्या चर्चेत पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचे पत्रकार म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्याने हिंदू(Hindu Rashtra) समुदाय एकत्र येणे अगदी योग्य आहे. जर का हा हल्ला शीख किंवा मुसलमान यांच्यावर झाला असता तर संपूर्ण जगात एकच गदारोळ माजला असता, असेही पाकिस्तानी पत्रकार डॉ. अमजद मिर्झा म्हणाले. हिंदूं(Hindu Rashtra)मध्ये एकजूट असली पाहिजे ती दिसत नाही, अशी खंतही पाकिस्तानी पत्रकार डॉ. अमजद मिर्झांनी व्यक्त केली.
(हेही वाचा पाकिस्तान जिंदाबाद म्हणतील त्यांचे पाय तोडा; CM Himanta Biswa Sarma यांचे पोलिसांना आदेश )
पाकिस्तानच्या एका वार्तालापात बोलताना पत्रकार काझमी आरजू म्हणाल्या, भारत हा धर्मनिरेपक्ष देश म्हणून गणला जात असला तरी भारत हिंदू राष्ट्र(Hindu Rashtra) बनावे असे पाकिस्तानी पत्रकार बोलताना मांडले. स्वतःला सेक्युलर, सेक्युलर सांगून आजही अवस्था झालीय असेही ते म्हणतायत. जगात जर बरेच मुस्लिम राष्ट्र असतील तर हिंदू राष्ट्र का नाही असू शकत हे कळायला काही मार्ग नाही, हे जर आम्ही म्हणत असू तर आमच्याबाबत पाकिस्तानात शिवराळ भाषा वापरली जाते, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा भोपाळमधील Love Jihad रॅकेटचा म्होरक्या फरहानला पोलिसांनी मारली गोळी; पण… )
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतर “आम्ही कोणालाही सोडणार नाही,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर म्हटले होते. हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा आवाज सर्वत्र येताना दिसत आहे. भारत सरकारकडून दहशतवाद्यांना अद्दल घडविण्याकरिता कडक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.(Hindu Rashtra)
Join Our WhatsApp Community