-
ऋजुता लुकतुके
मागच्या महिनाभरात अनुभवलेल्या तेजीनंतर बँक ऑफ बरोदाच्या शेअरची चाल या आठवड्यात काहीशी धिमी झाली आहे. पाच दिवसांत हा शेअर २ अंशांनी किंवा ०.८६ टक्क्यांनी खाली आला आहे. तर शुक्रवारी शेअर बाजार बंद होतानाही हा शेअर अर्ध्या टक्क्याने खाली होता. पण, हा अपवाद वगळला, तर महिनाभरात या शेअरने इतर सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांच्या बरोबरीने चांगली कामगिरी केली आहे. (Bank of Baroda Share Price)
शिवाय या आठवड्यात ६ मे ला बँकेच्या संचालक मंडळाची विशेष बैठक होईल. यात बँकेचा आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीचा निकाल मंजूर केला जाईल. त्याचबरोबर भागधारकांना दिला जाणारा लाभांशही ठरवला जाईल. त्यामुळे येणारा आठवडा हा या शेअरच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा असेल. (Bank of Baroda Share Price)
(हेही वाचा – Hudco Share Price : हुडकोचा शेअर खराब कामगिरीनंतर सुधारत आहे का?)
यापूर्वी जून २०२४ मध्ये बँक ऑफ बरोदाने भागधारकांना एका शेअर मागे ७.५६ रुपये इतका लाभांश दिला होता. आता मधले दिवस हे तिमाही निकालांच्या घोषणेचे असल्यामुळे बँक ऑफ बरोदाच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांना ट्रेडिंग करता येणार नाही. पुढील ट्रेडिंग विंडो ९ मे पासून खुली होईल. कुठलीही अनियमितता टाळण्यासाठी बँकेनं हे पाऊल उचललं आहे. (Bank of Baroda Share Price)
काही संशोधन संस्थांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, बँक ऑफ बरोदाला संपलेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत तोटा झालेला असू शकतो. गेल्या वर्षी याच कालावधीतील कामगिरीच्या मानाने बँकेची यंदाची कामगिरी खालावलेली असेल, असा अंदाज आहे. हा तोटा ५.०३ टक्क्यांनी असू शकतो. ॲक्सिस सेक्युरिटीजने हा अंदाज वर्तवला आहे. तर नेट मिळकतही घसरेल असा अंदाज आहे. पण, या शेअरमधील ताजा ट्रेंड बघितला तर गेल्यावर्षी याच कालावधीतील कामगिरीपेक्षा यंदा शेअरने ११ टक्के जास्त परतावा दिला आहे. तर मागच्या महिनाभरात हा शेअर १० टक्क्यांनी वाढला आहे. वर्षभरातील कामगिरी बघितली तर या शेअरने गुंतवणूकदारांना ३३ टक्के परतावा देऊन मालामाल केलं आहे. (Bank of Baroda Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. वाचकांनी आपल्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट कुठल्याही शेअरच्या खरेदी अथवा विक्रीचा सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community