भारत (India) संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुधारणा करत आहे. भारतीय सैन्यात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम (VSHORADS) येणारं आहे. कमी उंचीवर उडणारी हवाई क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि विमाने यांना काही सेकंदात लक्ष्य करण्याची क्षमता यात आहे. अतिशय कॉम्पॅक्ट आणि खांद्यावर वाहून नेता येणारे हे क्षेपणास्त्र आहे. वेगवान, पोर्टेबल आणि प्राणघातक अशी वैशिष्ट्ये याची आहेत.
Ministry of Defence issues RFI to procure Next-Gen Very Short Range Air Defence System (VSHORADS-NG):
The Requirement includes:
• 48 Launchers
• 48 Night Vision Sights
• 85 Missiles
• 01 Missile Test Station pic.twitter.com/yM5qbQgKW4— Defence Core (@Defencecore) May 3, 2025
खरेदी योजनेनुसार, ४८ लाँचर, ८५ क्षेपणास्त्रे आणि ४८ नाईट व्हिजन साइट्स भारताच्या शस्त्रास्त्रांच्या ताफ्यात जमा होणार आहेत. प्रगत इन्फ्रारेड होमिंगने सुसज्ज, VSHORADS कोणत्याही बाह्य मार्गदर्शनाशिवाय लक्ष्याचा वेध घेऊ शकते. तसेच -३०°C ते +५०°C तापमानात उंचावरून ते किनारपट्टीपर्यंत रात्रंदिवस ही यंत्रणा प्रभावीपणे कार्य करू शकते. (India)
(हेही वाचा Pakistan च्या उत्पादनांना भारतात नो एन्ट्री; मोदी सरकारचा आणखी एक अटॅक)
संरक्षण मंत्रालयाच्या (India) अलिकडच्याच एका अहवालानुसार याचा वापर केवळ लष्करच नाही तर नौदल आणि हवाई दल देखील जमीन आणि समुद्री हल्ल्यात करू शकतात. ज्यामध्ये जलद-प्रतिसाद आणि पॅरा-ड्रॉप ऑपरेशन्सचा समावेश आहे. सध्या, सशस्त्र दल जुन्या रशियन-मूळ इग्ला आणि इग्ला-एस सिस्टीमवर अवलंबून आहेत, ज्यामध्ये सुमारे 3,000 लाँचर्स सेवेत आहेत. दरम्यान, भारताचे (India) डीआरडीओ स्वतःचे व्हीएसएचओआरएडीएस विकसित करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे, ज्याची फेब्रुवारी 2025 मध्ये यशस्वी चाचणी केली आहे. पहिल्यांदाच, प्रत्यक्ष सैन्याने याचा वापर करून लक्ष्याचा वेध घेतला. डीआरडीओने तिन्ही दलांना 800 हून अधिक लाँचर्स आणि 5,000 क्षेपणास्त्रे देण्याचे नियोजित केले आहे. या हालचालीसह, भारतीय सैन्य जलद, स्मार्ट आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने संरक्षण व्यवस्था मजबूत करत आहे.
Join Our WhatsApp Community