-
ऋजुता लुकतुके
भारतातील आघाडीची बूट उत्पादक कंपनी बाटा इंडियाच्या शेअरमध्ये मागच्या सहा महिन्यात १० टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीने नोव्हेंबर २०२४ मध्ये गेल्यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीची निकाल जाहीर केला तेव्हापासून ही घसरण सुरू झाली आहे. त्यातच अर्थसंकल्पातूनही बूट उत्पादकांसाठी फारसं काही समाधानकारक बाहेर न आल्यामुळे ही घसरण काहीशी लांबली. (Bata India Share Price)
आता हा शेअर शुक्रवारी १,२०१ रुपयांवर बंद झाला आहे. त्यात एका दिवसांत ०.७६ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर आठवड्याभरातील घसरणही ०.६५ टक्क्यांची आहे. पण, मागच्या ६ महिन्यातील घसरण ही तब्बल १३५ अंशांची आहे. या शेअरचा वार्षिक उच्चांक १,६३३ अंशांचा आहे. पण, सध्या शेअर वार्षिक नीच्चांक म्हणजे १,१४० रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. शेअरमधील ही घसरण समजून घेऊया. (Bata India Share Price)
(हेही वाचा – Alok Industries Share Price : तिमाही निकालांनंतर या शेअरमध्ये लागलं अपर सर्किट)
बाटा इंडिया ही कंपनी देशातील एक मुख्य बूट उत्पादक कंपनीपैकी एक आहे. देशभरात कंपनीची फ्रँचाईजी स्टोअर मिळून एकूण १,८५७ दुकानं आहेत. शिवाय कंपनीची इतर वितरण व्यवस्थाही चोख आहे. त्यामुळे भारतात या कंपनीची कामगिरी चोख आहे. पण, अलीकडे एकूणच फूटवेअर क्षेत्रात वाढलेली स्पर्धा आणि प्युमा, आदिदास आणि रीबॉक सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडनी उभं केलेलं आव्हान यामुळे बाजारपेठेत फरक पडला आहे. त्याचा परिणाम बाटा सारख्या कंपन्यांना नक्कीच जाणवतोय. (Bata India Share Price)
त्यामुळेच मागच्या सहा महिन्यात कंपनीची कामगिरी काहीसी ढासळलेली आहे. कंपनीचा व्यावहारिक किंवा ऑपरेशनल नफा गेल्या दोन तिमाहींमध्ये कमी झाला आहे. हा नफा आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सरासरी १८९ कोटी रुपये इतका होता. तो यंदा १७६ कोटी रुपयांवर आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात फूटवेअर क्षेत्राला ‘मेक इन इंडिया’ चा नारा दिला. पण, त्याचाही म्हणावा तसा प्रभाव या शेअरवर दिसलेला नाही. असं असताना काही संशोधन संस्था मात्र बाटा इंडियावर अजूनही सकारात्मक आहेत. आयडीबीआय कॅपिटलने बाटा इंडियाचं लक्ष्य वाढवून १,५६१ रुपये इतकं केलं आहे. (Bata India Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. आणि गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर ही गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट गुंतवणूकदारांना कुठल्याही शेअर खरेदी अथवा विक्रीचा सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community