-
ऋजुता लुकतुके
रिलायन्स इंडस्ट्रीजने अलीकडे अलोक इंडस्ट्रीजमधील आपला वाटा वाढवून ४०.०१ टक्के इतका केला आहे. त्यामुळे एरवी घसरणाऱ्या या कंपनीला काहीसा आधार मिळाला आहे. चांगल्या तिमाही आकड्यांनंतर गेल्या आठवड्यात कंपनीने शानदार कामगिरी करताना अगदी एका दिवसांत २० टक्क्यांची वाढ अनुभवली आहे. २२ एप्रिल रोजी शेअरला अपर सर्किट लागलं. याचं कारण होतं कंपनीचे सकारात्मक तिमाही निकाल. (Alok Industries Share Price)
अलोक इंडस्ट्रीजने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आपला तोटा कमी करून तो ७४ कोटी रुपयांवर आणला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत हा तोटा २७२.९९ कोटी रुपये इतका होता. त्याहून दिलासा देणारी गोष्ट म्हणजे कंपनीने हा नफा महसूलातून कमावला आहे. म्हणजे कंपनीचा महसूल या तिमाहीत १९ टक्क्यांनी वाढून १०३८ कोटींवर पोहोचला आहे. ही सकारात्मकताच शेअरमध्ये दिसून आली. गेल्या आठवड्यातील तेजीनंतर शेअर आता नफारुपी विक्रीच्या चक्रात आहे. आणि या शुक्रवारी त्यात ०.६६ टक्क्यांची घसरण होऊन तो १६.४७ वर बंद झाला आहे. मागच्या महिनाभरात मात्र यात साडेतीन टक्क्यांची वाढ झाली आहे. (Alok Industries Share Price)
(हेही वाचा – Sreesanth Banned : केरळ क्रिकेट असोसिएशनकडून श्रीसंतवर ३ वर्षांची बंदी)
अलोक इंडस्ट्रीज ही देशातील एक आघाडीची कापड उत्पादक कंपनी आहे. कापडाबरोबरच तयार कपडे बनवण्यापर्यंतची मजल या कंपनीने मारली आहे. कंपनीचं मोठं कॉटन कापडाचं युनिट भारतात आहे. आता जरी कंपनीने चांगली कामगिरी नोंदवलेली असली तरी जोपर्यंत कंपनीचा शेअर ३० रुपयांच्यावर नियमितपणे ट्रेड करत नाही तोपर्यंत संशोधन संस्थांनी यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. (Alok Industries Share Price)
‘आताची कंपनीची कामगिरी बघता हा शेअर २१ ते २३ रुपयांपर्यंतची वाढ मधल्या टप्प्यात दाखवू शकतो. पण, ३० रुपयांच्या वर तो स्थिरावत नाही, तोपर्यंत त्याविषयी नेमका अंदाज बांधता येणार नाही. शेअरचा मूलभूत अभ्यास करायचा झाल्यास सध्या काही ट्रिगर मिळत नाहीत,’ असं वेल्थमिल्स स्ट्रॅटेजीजचे क्रांती बथिनी यांनी म्हटलं आहे. आनंद राठी संशोधन संस्थेनंही नजीकच्या काळात या शेअरची पातळी रुपये २१ ते रुपये २४ याच्या दरम्यान राहील असा अंदाज वर्तवला आहे. अलोक इंडस्ट्रीजमध्ये ४०.०१ टक्के वाटा रिलायन्सचा. तर ३४.९९ टक्के वाटा जेएम फायनान्शिअल्सलचा आहे. (Alok Industries Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमध्ये खरेदी अथवा विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community