जागतिक अस्थिरतेमुळे सोने भावा(Gold Rate)त गेल्या सहा महिन्यांत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. रशिया-युक्रेन युध्द, ट्रम्प प्रशासनाचा टॅरिफ निर्णय आणि त्यानंतर अमेरिका-चीन संबंधातील तणावर या सर्व घडामोडींचा परिणाम जागतिक पातळीवर दिसून आला. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून सोने गुंतवणुकीत सर्वसामान्यांचा वाढता ओढा लक्षात घेता गुंतवणूकदारांनी सोने हा पर्याय निवडला. २४ कॅरेट सोने भाव(Gold Rate) ९६,०९५ प्रतितोळा इतका आहे तर २२ कॅरेट सोने भाव प्रतितोळा ८७,५५० रुपये इतका आहे.
(हेही वाचा Gold Rate Fall : सोन्याचे दर आणखी २७,००० रुपयांनी घसरणार? जागतिक कंपनीचा दावा )
दरम्यान, बाजारतज्ज्ञांकडून सोने किंमती(Gold Rate)बाबत नवा अंदाज व्यक्त करण्यात येत असून येत्या चार ते सहा महिन्यांत सोने भाव ८० हजारांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चालू मे महिन्यात लग्नसराईचा काळ सुरू असताना सोनं घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना यातून मोठा दिलासा मिळू शकतो. पुढील चार-पाच महिन्यानंतर सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसू शकतो. एक लाख रुपयांचा टप्पा पार करणाऱ्या सोने दरा(Gold Rate)त लवकरच मोठी घसरण होणार असल्याची शक्यता केडिया अॅडव्हायजरीकडून व्यक्त करण्यात येत आहे.
केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय सुरेश केडिया यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, आगामी चार ते सहा महिन्यांमध्ये सोन्याचे दर तब्बल १९ हजार रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सोनं खरेदी करायचा निर्णय घ्यायचा की नाही, असा संभ्रम गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला आहे. एकंदरीत, जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि व्यापार युध्दाच्या सावटामुळे सोन्याचा दरा(Gold Rate)ने १ लाखांचा विक्रमी टप्पा गाठल्याचे पाहायला मिळाले.(Gold Rate)
Join Our WhatsApp Community