Jio World Centre : मुकेश अंबानींच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये नेमकं काय काय आहे?

Jio World Centre : जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जाण्यासाठीचं शुल्क किती आहे?

28
Jio World Centre : मुकेश अंबानींच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये नेमकं काय काय आहे?
  • ऋजुता लुकतुके

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखलं जाणारं जिओ वर्ल्ड सेंटर २०२२ पासून कार्यान्वित आहे. मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी लक्षपूर्वक त्याची उभारणी केली आहे. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात ५ एकर परिसरात हे केंद्र उभं आहे. २०२३ ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक या संकुलात झाली तेव्हा उपस्थितांनी या केंद्राचं तोंड भरून कौतुक केलं होतं. पुढे जागतिक स्तरावरील कार्यक्रम आणि बैठका इथं व्हाव्यात यासाठीच हे केंद्र उभारण्यात आलं आहे. या संकुलात व्यापार, मनोरंजन, निवास अशा सगळ्या सुविधा एका छत्राखाली आहेत. (Jio World Centre)

(हेही वाचा – Uttarakhand हिंदू राज्य होण्याच्या मार्गावर; राज्याबाहेरील नागरिकांना जमीन खरेदी करण्यावर बंदी)

  • १८.५ एकरमध्ये जिओ वर्ल्ड सेंटर उभं आहे.
  • यात जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर, धीरूभाई अंबानी स्क्वेअर, नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर, फाऊंटन ऑफ जॉय, कार्यालयीन जागा, रिटेल व्यापारी जागा, जिओ वर्ल्ड गार्डन, क्लब हाऊस आणि अगदी निवासी जागाही एकाच छत्राखाली उपलब्ध आहेत.
  • १०,६४० लोकांची बैठक व्यवस्था या कन्वेंशन सेंटरमध्ये होऊ शकतो.
  • ५ जीचा वापर तुम्ही या कन्वेंशन सेंटरमध्ये करू शकता.
  • एक लाख ६१ हजार चौफूटपेक्षा जास्त क्षेत्रफळात तयार करण्यात आलेले तीन प्रदर्शन हॉल या सेंटरमध्ये आहेत. या कन्वेंशन सेंटरमध्ये पाच हजार कार पार्किंगची व्यवस्था आणि १८ हजार लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे.
  • ३,२०० पाहुण्यांसाठी बॉलरूम आणि २५ मिटींग रूमची व्यवस्था देखील या कन्वेंशन सेंटरमध्ये केली जाणार आहे.

‘जियो वर्ल्ड सेंटर हे नवीन भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. सर्वात मोठे मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रीमियम रिटेलिंग आणि जेवणाच्या सुविधा इत्यादी गोष्टींचे आयोजन या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये केलं जाणार आहे. हे जियो वर्ल्ड सेंटर एक असे केंद्र होईल जिथे आपण एकत्र मिळून भारताचा विकास करू,’ असं नीता अंबानी या केंद्राचं उद्घाटन करताना म्हणाल्या होत्या. (Jio World Centre)

(हेही वाचा – Willingdon Sports Club : विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबचं सदस्य शुल्क नेमकं किती आहे?)

‘जियो वर्ल्ड कन्वेशन सेंटर’ हा जियो वर्ल्ड सेंटरचा एक भाग आहे. धीरूभाई अंबानी स्क्वेअर आणि म्युझिकल ‘फाउंटन ऑफ जॉय’ हे या सेंटरच्या सुरुवातीच्या टप्प्यात उघडण्यात आले होते. मुंबईचे प्रीमियम रिटेल डेस्टिनेशन जिओ वर्ल्ड ड्राइव्हचे उद्घाटन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये करण्यात आले होते. सर्व्हिस अपार्टमेंट आणि ऑफिसेससह सांस्कृतिक केंद्र, म्यूझिकल फाऊंटन, दुकाने, कॅफे आणि रेस्टॉरंट्स अशा सर्व सुविधा असलेले हे भारतातील पहिले कन्व्हेन्शन सेंटर आहे. जियो वर्ल्ड सेंटरमधील धीरूभाई अंबानी स्क्वेअर हे पर्यटकांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. यामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश मोफत असेल. यासाठी फ्री पास तुम्ही dhirubhaiambanisquare.com या वेब साइटवरून घेऊ शकता. पाण्याचे कारंजे, लाइट्स आणि संगीत यांच्या अप्रतिम समन्वयाने तयार केलेले फाउंटन ऑफ जॉयचे संगीतमय प्रदर्शन तुम्ही पाहू शकाल. यात आठ फायर शूटर, ३९२ वॉटर जेट्स आणि ६०० हून अधिक एलईडी लाइट्स आहेत, जे संगीताच्या तालावर फिरतात. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सामान्य लोकही पर्यटनासाठी जाऊ शकतात. त्यासाठी १० रुपये इतकं प्रवेश शुल्क ठेवण्यात आलं आहे. (Jio World Centre)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.