-
ऋजुता लुकतुके
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. त्याचवेळी बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारामुळे भारत आणि बांगलादेशचे संबंधही फारसे बरे नाहीत. त्यामुळे २०२५ मध्ये होणारा बांगलादेश संघाचा भारत दौरा आणि त्यानंतर प्रस्तावित असलेला आशिया चषक या दोन्ही स्पर्धांवर टांगती तलवार आहे. भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात बांगलादेशमध्ये ३ एकदिवसीय आणि २ टी २० सामने खेळण्यासाठी जाणार आहे. (Indo – Pak Cricket)
(हेही वाचा – Tanisha Bhise यांच्या जुळ्या बाळांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २४ लाखांची तातडीची मदत)
‘हा दौरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमाचा भाग आहे. पण, त्याविषयी अजून काही निश्चित झालेलं नाही. हा दौरा नियोजनाप्रमाणे पार पडेल का हे ही अजून निश्चित नाही,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी म्हटलं आहे. अलीकडेच बांगलादेशच्या एका निवृत्त सरसेनापतींनी भारताच्या संभाव्य पाकिस्तान हल्ल्यावरून कडवड विधान केलं आहे. ते सोशल मीडियावर जाहीरपणे मांडलंही आहे. ‘भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास, भारताच्या ७ ईशान्येकडील राज्यांवर बांगलादेशने हल्ला करावा आणि ती ताब्यात घ्यावीत. त्यासाठी चीनने बांगलादेशला मदत करावी,’ असं विधान एएलएम फजहुल रेहमान यांनी केलं आहे. (Indo – Pak Cricket)
(हेही वाचा – IPL 2025, GT vs SRH : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल मैदानातच इतका का भडकला?)
ईशान्य भारतावरील हल्ला हा बांगलादेश आणि चीनची संयुक्त कारवाई असू शकते, असंच थेटपणे रेहमान यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भारतीय संघ ठरल्याप्रमाणे बांगलादेशचा दौरा करेल अशी शक्यता कमीच आहे. पण, त्यावर अजून काही ठरलेलं नाही. फक्त हा दौराच नाही तर त्यानंतर सप्टेंबरमध्ये प्रस्तावित असलेली आशिया चषक स्पर्धाही धोक्यात आहे. या स्पर्धेचं ठिकाणही अजून निश्चित झालेलं नाही. त्रयस्थ ठिकाणी तो व्हावा एवढीच एकवाक्यता याबाबतीत आहे. पण, आता भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेले संबंध पाहता, या स्पर्धेविषयी अनिश्चितताही वाढलेली आहे. आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी नव्हती. पण, आता उभय देशांमध्ये त्रयस्थ ठिकाणीही क्रिकेटचे सामने होणं कठीण आहे. (Indo – Pak Cricket)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community