मुंबईकरांसाठी (MegaBlock) एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने देशव्यापी प्री-मेडिकल प्रवेश परीक्षेच्या (NEET-2025) पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रविवार (4 मे) रोजी असणारा साप्ताहिक मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. यामुळे NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही. (MegaBlock)
हेही वाचा-India Vs Pakistan War : पाकिस्तानने दिली पाचव्यांदा क्षेपणास्त्र चाचणीची पोकळ धमकी !
मध्य रेल्वेने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, ‘मध्य रेल्वे, हार्बर लाईन आणि ट्रान्स हार्बर लाईनवर कोणताही मेगाब्लॉक असणार नाही.’ यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलाला मिळाला आहे. कारण मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवांवर दर रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो, ज्यामुळे काही तासांसाठी सेवा थांबवली जाते किंवा काही गाड्या रद्द केल्या जातात. मात्र मध्य रेल्वे मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक असणार नाही. मात्र लोकलची संख्या कमी करण्यात येणार आहे. (MegaBlock)
हेही वाचा- Earthquake : जम्मू- काश्मीर आणि गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के !
पश्चिम रेल्वेवर 3 आणि 4 मे रोजी रात्री 12.15 ते 4.15 दरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर चार तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सांताक्रूझ आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जाणार आहेत अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे. हा रात्रकालीन ब्लॉक असल्याने या ब्लॉकचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर होणार नाही. (MegaBlock)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community