IPL 2025, GT vs SRH : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल मैदानातच इतका का भडकला?

IPL 2025, GT vs SRH : पंचांच्या धावचितच्या निर्णयावर शुभमन नाराज होता.

69
IPL 2025, GT vs SRH : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल मैदानातच इतका का भडकला?
  • ऋजुता लुकतुके

मागच्या दोन हंगामात शुभमन गिल गुजरात टायटन्सचं नेतृत्व करत आहे आणि फलंदाज म्हणूनही शुभमन फ्रँचाईजीसाठी मोलाची कामगिरी बजावत आहे. सध्या गुजरातचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैद्राबादविरुद्धच्या सामन्यात गुजरातचा हा कर्णधार आपला राग आवरू शकला नाही. शुभमन गिलला वादग्रस्त निर्णय देत पंचांनी धावचित ठरवलं आणि त्यावरून शुभमन चवताळला. बाद झाल्यानंतर शुभमन गिल मैदानाबाहेर गेला तिथंही राखीव पंचांबरोबर त्यानं वाद घातला. (IPL 2025, GT vs SRH)

शुभमन गिलनं १० चौकार आणि २ षटकार मारत ३८ चेंडूंत ७६ धावा केल्या. साई सुदर्शनच्या जोडीने शुभमन गिलने ८७ धावांची सलामी दिली. साई सुदर्शनने ४८ तर जोस बटलरने ६४ धावा केल्या. शुभमन गिलला १३ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तिसऱ्या पंचांनी वादग्रस्तरित्या बाद दिलं. यानंतर शुभमन गिलच्या संतापाचा भडका उडाला. तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यानंतर शुभमन गिलनं मैदान सोडलं, तो मैदानाबाहेर गेला डगआऊटच्या तिथं असलेल्या पंचांसोबत त्यानं वाद घातला. या वादाचा व्हिडिओ स्टार स्पोर्टसनं शेअर केला आहे. (IPL 2025, GT vs SRH)

(हेही वाचा – Thackeray Vs Shinde : “शिवसेनेचे नवे बॅनर युद्ध!; ‘मैत्री वाघाशी’, शिवसेना उबाठावर थेट हल्ला”)

सनरायजर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो त्यांना अडचणीत आणणारा ठरला. साई सुदर्शन, शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर गुजरातनं ६ गडी गमावून २२४ धावा केल्या. शुभमन गिलनं गुजरातसाठी सलग तिसरं अर्धशतक झळकावलं. त्यानं केकेआर विरुद्ध ९०, राजस्थान विरुद्ध ८४ धावा केल्या होत्या. (IPL 2025, GT vs SRH)

शुभमन गिलनं यंदाच्या आयपीएलमध्ये १० सामन्यांत ४६५ धावा केल्या आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे. गुजरातचा दुसरा सलामीवीर साई सुदर्शन ५०४ धावांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव ४७६ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, जोस बटलर तिसऱ्या स्थानावर असून त्याच्या नावावर ४७० धावा आहेत. दरम्यान, गुजरात टायटन्सनं सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. गुजरातनं सनरायजर्स हैदराबादला १८६ धावांवर रोखत ३८ धावांनी विजय मिळवला. (IPL 2025, GT vs SRH)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.