India Vs Pakistan War : पाकिस्तानने दिली पाचव्यांदा क्षेपणास्त्र चाचणीची पोकळ धमकी !

India Vs Pakistan War : पाकिस्तानने दिली पाचव्यांदा क्षेपणास्त्र चाचणीची पोकळ धमकी !

114
India Vs Pakistan War : पाकिस्तानने दिली पाचव्यांदा क्षेपणास्त्र चाचणीची पोकळ धमकी !
India Vs Pakistan War : पाकिस्तानने दिली पाचव्यांदा क्षेपणास्त्र चाचणीची पोकळ धमकी !

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानची कायमची अद्दल घडवा, अशी मागणी भारतभरातून होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरू आहेतच, मात्र दहशतवाद्यांचे आका सीमापार पाकिस्तानात आहेत. त्यांना धडा शिकवण्याची तयारी सुरू झालीय. भारताच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानला धडकी भरल्याचे दिसून येतंय. (India Vs Pakistan War)

हेही वाचा-पुण्यात ‘Hit And Run’ ! भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवलं ; एकाचा मृत्यू , दोन जखमी

पाकिस्तानने सलग पाचव्यांदा क्षेपणास्त्र चाचणीची पोकळ धमकी दिली आहे. यापूर्वीही पाक ने चार वेळा क्षेपणास्त्र चाचणीची धमकी दिली होती. यावेळी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करणार असल्याचे सांगत आहे. भारताला चिथावणी देण्याचा निष्काळजी प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. (India Vs Pakistan War)

हेही वाचा- एकाने अत्याचार केला तरी सोबतचेही दोषी : Supreme Court

पहलगाममधल्या पर्यटकांवरच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचाच हात आहे. आता याचे धडधडीत पुरावेसुद्धा समोर आलेत. हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयएच्या प्राथमिक अहवालात मोठा खुलासा समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि लष्कर ए तोयबाचा हात आहे. या हल्ल्या चा कट थेट पाकिस्तानी लष्कर ए तोयबाच्या मुख्य ऑफिसमध्ये शिजल्याची माहिती समोर येत आहे. (India Vs Pakistan War)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.