भारतीय रेल्वेच्या (IRCTC ) माध्यमातून दररोज लाखो प्रवाशी प्रवास करत असतात. आता याच प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने १ मे पासून कोट्यवधी प्रवाशांसाठी एक मोठा बदल लागू केला आहे. १ मे २०२५ पासून, कन्फर्म तिकिटांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अनुभव पूर्वीपेक्षा चांगला होणार आहे. कारण नवीन नियमांनुसार, प्रतीक्षा यादीतील तिकिटे असलेल्या प्रवाशांना स्लीपर किंवा एसी कोचमधून प्रवास करण्याची परवानगी मिळणार नाही. ज्या प्रवाशांकडे प्रतीक्षा यादीतील तिकीट असेल, त्यांना फक्त जनरल क्लासमधूनच प्रवास करता येणार आहे. (IRCTC )
विशेष म्हणजे, जर आयआरसीटीसी द्वारे बुक केलेले ऑनलाइन तिकीट प्रतीक्षा यादीत राहिले तर ते आपोआप रद्द होते. पण, काउंटरवरून तिकिटे खरेदी करणारे प्रतीक्षा यादीतील प्रवासी अजूनही स्लीपर आणि एसी कोचमधून प्रवास करतात. १ मे पासून प्रतीक्षा यादीतील तिकिटांसह स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर या कोचमध्ये प्रतीक्षा तिकीट असलेला प्रवासी सीटवर बसलेला आढळला तर टीटीईला त्या व्यक्तीकडून दंड आकारण्याचा किंवा त्याला सामान्य कोचमध्ये स्थानांतरित करण्याचा अधिकार असेल. (IRCTC )
हेही वाचा- Weather Update : उत्तरेकडील राज्यांना अवकाळीचा फटका ! वादळामुळे १० जणांचा मृत्यू
प्रतीक्षा यादीतील तिकिटासह आरक्षित कोचमध्ये प्रवास करणे अनधिकृत मानले जाईल. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना दंडाला सामोरे जावे लागेल. स्लीपर क्लाससाठी २५० रुपयांपर्यंत आणि एसी क्लाससाठी ४४० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. (IRCTC )
जर प्रवाशांना स्लीपर किंवा एसी क्लासमध्ये प्रवास करायचा असेल तर त्यांनी प्रवासाच्या तारखेपूर्वी त्यांची तिकिटे कन्फर्म करावीत असे आवाहन भारतीय रेल्वेकडून करण्यात आले आहे. (IRCTC )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community