उत्तर प्रदेशात Indian Air Force देशातील पहिली एअरक्राफ्ट नाईट लँडिंग ड्रील होणार आहे. या नाईट लँडिंग ड्रीलमध्ये राफेल-सुखोई आणि जग्वार यांचा सहभाग असणार आहे. भारत-पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दल सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय हवाई दलाने आपली ताकद दाखवली असून वादळातही ३.५ किमी लांबीच्या धावपट्टीवर जग्वार, मिराज सारख्या १५ लढाऊ विमानांनी ‘टच अँड गो’ केले.
(हेही वाचा सिंधूचे पाणी थांबवणे चुकीचे म्हणणाऱ्या Rakesh Tikait यांना पगडी काढून पिटाळून लावले)
दरम्यान, देशात पहिल्यांदाच, एअरस्ट्रिपवर रात्री लँडिंग शो होणार असून संध्याकाळी, ३ तासांचा नाईट लँडिंग शो असेल, जो संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल आणि रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहे. प्रथम, C-130J सुपर हरक्यूलिस विमानाने एक्सप्रेसवेवर ‘टच अँड गो’ केले. यानंतर, जग्वार, मिग आणि राफेल विमानांनी आकाशात एकत्र एअर शो केला. गंगा एक्सप्रेसवेवर फक्त AN-32 लढाऊ विमान उतरले. यानंतर पायलटने लढाऊ विमान वाऱ्याच्या दिशेने वळवित हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी सुमारे दोन तास सराव केला.
शाहजहांपूरचे डीएम धर्मेंद्र प्रताप सिंह म्हणाले की, देशात पहिल्यांदाच धावपट्टीवर रात्री लँडिंग शो होणार आहे. हवाई दलाच्या गरजा लक्षात घेऊन धावपट्टीची रचना करण्यात आली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ताबडतोब धावपट्टीत बदलू शकते. त्याचबरोबर, येथे एक रुग्णालयही बांधण्यात आले आहे. विशेष म्हणजे गंगा एक्सप्रेसवे ३६,२३० कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. मेरठ ते प्रयागराज पर्यंत बांधण्यात येणारा हा ५९४ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. त्याचा ५०-६० किलोमीटरचा भाग जलालाबाद परिसरातून जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी ५०० हून अधिक शालेय मुले, लोकप्रतिनिधी आणि सामान्य लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. ४० निरीक्षक, ९० उपनिरीक्षक, १५ सीओ आणि १०० वाहतूक पोलिसांसह सुमारे १००० पोलिस तैनात केले जातील. Indian Air Force
Join Our WhatsApp Community