लाडकी बहीण योजनेंतर्गत(Ladki Bahin Yojana) एप्रिल महिन्याचा सन्मान निधी कधी मिळणार, याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. अशातच आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana)या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात पाठविण्यास आजपासून प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
Pahalgam Terror Attack महाराष्ट्र सायबर विभागाची दमदार कामगिरी
दरम्यान, सन्मान निधी बँक खात्यात जमा होण्यास २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. तसेच, या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे, असेही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पोस्टच्या माध्यमातून दिली. महायुती सरकारने आणलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनें’तर्गत(Ladki Bahin Yojana) पात्र लाभार्थ्यांना दरमहा २१०० रुपयांचा निधी वितरीत करण्यात येतो.
विशेष म्हणजे एप्रिल महिना संपून मे महिना सुरु झाल्याने राज्यातील लाडक्या बहिणींना योजनें(Ladki Bahin Yojana)तर्गत निधीची वाट पाहत आहेत. त्यातच आता मंत्र्यांनी यासंदर्भात पोस्ट करून सर्व पात्र लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.(Ladki Bahin Yojana)
Join Our WhatsApp Community