EDच्या प्रकरणात नवीन कायद्यांतर्गत फरार घोषित करणारी पहिलीच घटना; नेमकं प्रकरण काय वाचा

सक्तवसुली संचालनालया(ED)ने न्यायालयात म्हटले की, रशीद वसीमने सुमारे १ हजार कोटी रुपयांची लोकांची फसवणूक केली.

106
मालेगावमध्ये ED च्या ९ ठिकाणी धाडी; बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्यांकडून बनावट जन्म दाखले जप्त
मालेगावमध्ये ED च्या ९ ठिकाणी धाडी; बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्यांकडून बनावट जन्म दाखले जप्त

शाईन सिटीचा मालक रशीद नसीमला लखनऊमधील विशेष न्यायालयाने फरार घोषित केले. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता घेऊन रशीद नसीम दुबईला पळून गेल्याचे आता सिध्द झाले आहे. सक्तवसुली संचालनालया(ED)ने न्यायालयात म्हटले की, रशीद वसीमने सुमारे १ हजार कोटी रुपयांची लोकांची फसवणूक केली. २०१९ मध्ये रशीद नसीम नेपाळमार्गे दुबईला पळून जाण्याकरिता बनावट पासपोर्टचा वापर केल्याचेही ईडी(ED)ने न्यायालयात म्हटले.

(हेही वाचा उत्तर प्रदेशात १७ Masjid, मदरशांवर चालणार बुलडोझर; नेपाळ सीमेवर सुरु आहे ‘लँड जिहाद’)

दरम्यान, लखनऊमधील विशेष न्यायालयाने रशीद नसीमला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून घोषित केले. विजय माल्या आणि नीरव मोदी सारख्या फरार गुन्हेगारानंतर आता नसीमला नवीन कायद्यांतर्गत फरार घोषित करण्याची पहिलीच घटना नोंदविण्यात आली आहे. शाईन सिटीचा मालक रशीद नसीमला नवीन कायद्याद्वारे फरार घोषित करत उत्तर प्रदेशात पहिलीच घटना ठरली आहे. रशीद नसीम हा शाईन सिटी नावाच्या कंपनीचा मालक असून त्याने लोकांना त्यांचे कष्टाचे पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतविण्यास सांगितले. त्यानंतर लोकांना फसवून त्यांचे कोट्यवधी रुपये घेऊन दुबईला पळून गेला.

विशेष म्हणजे किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्या आणि पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी यासारख्या काही मोठ्या फसवणूक करणाऱ्यांनाही यापूर्वी अशाच प्रकारे फरार घोषित करण्यात आले आहे. परंतु या नवीन कायद्याअंतर्गत एखाद्या आरोपीला फरार घोषित करण्याची ही उत्तर प्रदेशातील पहिलीच घटना आहे. रशीद नसीमची सुमारे १२८ कोटींची मालमत्ता याआधीच सक्तवसुली संचालनालया(ED)ने जप्त केली असून त्याविरुध्द फसवणुकीचे ५५४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अलीकडेच, सक्तवसुली संचालनालया(ED)ने त्याच्या काही सहकाऱ्यांनादेखील अटक केली असून त्यांची १९० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.