-
प्रतिनिधी
भाजपा नेत्या आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना कॉल करून अश्लील शब्द वापरणाऱ्या बीडच्या अमोल काळे याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी केली आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मागील काही दिवसांपासून राज्यातील भाजपा नेत्या आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना वारंवार कॉल आणि आक्षेपार्ह संदेश करुन लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होता.
(हेही वाचा – J. J. Hospital च्या रक्त तपासणी विभागात एसी यंत्रणा कोलमडली; रुग्ण आणि कर्मचारी त्रस्त)
कॉल करणारी व्यक्ती ही मुंडे (Pankaja Munde) यांना कॉल करून अश्लील भाषेचा वापर करीत होती. दरम्यान मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजपाच्या महाराष्ट्र कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे (२६) यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. भामरे यांनी मुंबई नोडल सायबर पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे, सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींसह भारतीय न्याय संहिता कलम ७८ आणि ७९ अंतर्गत गुन्हा नोंदवला.
(हेही वाचा – Central Railway QR Code Service : मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकासाठी क्यूआर कोड सुरू)
तक्रारीनंतर, सायबर पोलिसांनी आरोपीचा माग काढून पुण्यातून अमोल काळे याला अटक करण्यात आली. अमोल काळे हा बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवाशी आहे, काळे हा शिक्षण घेत आहे. त्याने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना कॉल करून अश्लील भाषेचा वापर का केला, त्यामागे त्याचा काय उद्देश होता याचा तपास सुरू असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community