J. J. Hospital च्या रक्त तपासणी विभागात एसी यंत्रणा कोलमडली; रुग्ण आणि कर्मचारी त्रस्त

68
J. J. Hospital च्या रक्त तपासणी विभागात एसी यंत्रणा कोलमडली; रुग्ण आणि कर्मचारी त्रस्त
  • प्रतिनिधी

राज्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या जे. जे. रुग्णालयातील रक्त तपासणी विभागातील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्यामुळे रुग्ण आणि कर्मचारी यांना तीव्र उन्हामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तपासणी विभागात एकूण पाच एसी यंत्रणा लावण्यात आल्या आहेत, मात्र त्यातील केवळ एकच एसी सुरू असून उर्वरित चार यंत्रणा बंद आहेत. (J. J. Hospital)

(हेही वाचा – Central Railway QR Code Service : मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकासाठी क्यूआर कोड सुरू)

रक्त तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असताना, विभागात उष्म्यामुळे घामाघूम स्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला आजारपणाने ग्रस्त रुग्ण, तर दुसऱ्या बाजूला तपासणी करणारे टेक्निशियनही उष्णतेने त्रस्त झाले आहेत. या असह्य परिस्थितीत तपासण्या सुरळीत पार पडणे अवघड झाले आहे. (J. J. Hospital)

(हेही वाचा – भारताशी गद्दारी! पाकिस्तानी गुप्तहेर Pathan Khan याला जैसलमेरमधून अटक)

यातच रुग्णालयाच्या बाजूलाच नव्या सुपर स्पेशालिटी इमारतीचे काम सुरु असून, सुरक्षेसाठी लावलेले मोठमोठे पत्रे खिडक्यांवर आडवे असल्याने नैसर्गिक हवाही आत येत नाही. त्यामुळे विभागात गरम आणि दमट वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांच्या आरोग्यासोबतच कर्मचारी वर्गाच्या कार्यक्षमतेवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निरीक्षण आहे. प्रशासनाने तातडीने एसी यंत्रणा दुरुस्त करून कार्यरत कराव्यात, अशी मागणी रुग्ण आणि कर्मचाऱ्यांकडून होत आहे. (J. J. Hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.