भारताशी गद्दारी! पाकिस्तानी गुप्तहेर Pathan Khan याला जैसलमेरमधून अटक

108
Pathan Khan : राजस्थान इंटेलिजेंसला मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी जैसलमेरच्या झिरो आरडी मोहनगड भागातून पठाण खान (४०) या पाकिस्तानी गुप्तहेराला (Pakistani spy Pathan Khan) अटक करण्यात आले आहे. पठाण खानवर भारत आणि लष्कराशी संबंधित धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला (ISI) व्हिडिओ आणि फोटो स्वरूपात पाठवल्याचा गंभीर आरोप आहे. (Pathan Khan)

(हेही वाचा – Siren system : भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये वाढली भीती, ‘या’ शहरांमध्ये बसवले सायरन सिस्टीम )

जैसलमेरमधून पाकिस्तानी गुप्तहेर पकडला
पठान खान हा दीर्घ काळापासून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करत होता. महिन्याभरापूर्वी त्याला संशयावरुन ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांच्या हालचाली संशायस्पद आढळल्या. त्यानंतर जयपूरमधील केंद्रीय चौकशी केंद्रात त्याला आणण्यात आले. त्यात आयएसआय हँडलरच्या निर्देशावरुन तो भारताची गोपनीय माहिती पाठवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे १ मे रोजी त्याला अटक करण्यात आली.
२०१३ मध्ये पठान खान पाकिस्तानात गेला होता. पाकिस्तानात त्याचे अनेक नातेवाईक आहेत. तो पाकिस्तानला गेला असताना आयएसआयसोबत त्याचा संपर्क झाल्याची शक्यता तपास संस्थाना आहे. त्याला ऑफिसियल सीक्रेट एक्टनुसार अटक करण्यात आली आहे. पठान खान हा १२ वर्षांपासून आयएसआयसाठी काम करत होता. परंतु त्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांना मिळाली नाही.
(हेही वाचा – Shahid Afridi : भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या शाहीद आफ्रिदीचं युट्यूब चॅनल प्रसारण भारतात अखेर बंद )
संवेदनशील भागाचे व्हिडिओ पाठवले
पठान खान याने लष्कराच्या संवेदनशील भागाचे फोटो आणि व्हिडिओ घेतले होते. हे त्याने पाकिस्तानला पाठवले. त्याच्या चौकशीतून आणखी इतर माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पैशांच्या मोहात तो जैसलमेर आंतरराष्ट्रीय सीमेची (Jaisalmer International Border) संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानी हँडलरला शेअर करत होता. पाकिस्तानच्या आयएसआयमधील अधिकाऱ्याने त्याला भारतीय सीमकार्डही उपलब्ध करुन दिले होते.
पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack) भारत आणि पाकिस्तान सीमेवर हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. सीमेवर बीएसएफ, लष्कर आणि पोलिसांच्या हालचाली वाढल्या आहेत. बीएसएफचे (BSF) जवान कठोर पहार देत आहे. या परिस्थितीत पाकिस्तानी गुप्तहेर पकडला गेल्यानंतर गुप्तचर संस्था अधिक सतर्क झाल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.