-
प्रतिनिधी
“छगन, कमळ बघ!” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही काळापूर्वी केलेले हे वाक्य आता राजकीय सत्यात रूपांतर होण्याच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतल्यानंतर नव्या राजकीय समीकरणांची चिन्हे दिसू लागली आहेत. (Bhujbal Meet Fadnavis)
पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी भुजबळ-फडणवीस भेट, चर्चांना उधाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्याचा मुंबई दौरा लक्षात घेता, छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली ही ‘टायमिंग परफेक्ट’ भेट अनेक अर्थांनी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरत आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर तीन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत : (Bhujbal Meet Fadnavis)
- भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार?
- भुजबळ भाजपामध्ये प्रवेश करणार?
- फडणवीसांचे “कमळ बघ” वाक्य सत्यात उतरणार?
(हेही वाचा – Crime News : नैनीतालमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मोहम्मद उस्मानवर गुन्हा दाखल ; हिंदू संघटनांनी केला निषेध)
नाराजीचा सूर आणि नवे राजकीय पर्याय भुजबळ सध्या अजित पवार गटात नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना डावलण्यात आले आणि त्यानंतर राज्यसभा उमेदवारीही नाकारण्यात आल्यामुळे त्यांची नाराजी अधिक तीव्र झाली आहे. त्यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत उघडपणे असमाधान व्यक्त केले होते. (Bhujbal Meet Fadnavis)
जातीनिहाय जनगणना व बहुजन नेत्याचा पवित्रा
केंद्र सरकारने अलीकडेच जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. छगन भुजबळ हे ओबीसी समाजातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या मुद्यावरून ते भाजपासोबत जाण्याची शक्यता अधिक बळावते. भाजपासाठी हा एक रणनीतिक डाव ठरू शकतो ज्यामुळे ओबीसी समाजातील नाराजी कमी होण्याची शक्यता आहे. (Bhujbal Meet Fadnavis)
(हेही वाचा – KSRTC Driver Video : “ड्रायव्हरने बस थांबवली आणि नमाज अदा केला” ; प्रवाशांना नाहक त्रास, Video Viral)
राजकीय पुनर्रचना?
भुजबळांच्या या हालचालीमुळे अजित पवार गटात हालचाल उडाली असून, भविष्यात मोठी राजकीय पुनर्रचना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाकडून भुजबळांना मंत्रिपदाची ऑफर मिळाली असल्याचीही माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. (Bhujbal Meet Fadnavis)
राजकीय संकेत स्पष्ट!
फडणवीसांनी काही महिन्यांपूर्वी भुजबळांना उद्देशून केलेले “छगन, कमळ बघ!” हे वाक्य आजच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अधिकच अर्थपूर्ण ठरत आहे. भाजपाकडे झुकणाऱ्या भुजबळांच्या भूमिकेमुळे हे वाक्य प्रत्यक्षात उतरेल का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Bhujbal Meet Fadnavis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community