Nashik Kumbh Mela 2027: साधूग्रामसाठी अतिरिक्त जागा भाडेतत्वावर घेण्यावर एकमत, ५०० एकर जागा आरक्षित केली जाणार

53

Nashik Kumbh Mela 2027 : सिंहस्थासाठी साधुग्राम (Simhastha Sadhugram) उभारणीसाठी तपोवन भागात ३५० एकर जागा महापालिका प्रशासनाने आरक्षित केली. मात्र मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा अधिक गर्दी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी अजून २०० एकर जागा लागणार असून ती भाडेतत्वावर घेण्याचा पर्याय पुढे आला आहे. त्याबाबचा निर्णय जिल्हा व मनपा प्रशासनाने घेतला आहे. याबाबतची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच जिल्हा नियोजन समितीचे सिंहस्थ आढावा बैठक विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गडांम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. (Nashik Kumbh Mela 2027)

(हेही वाचा – BJP प्रदेश कार्यालयाच्या भाडे करारास मुदतवाढ)

प्रस्तावित सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दोन वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. तर ध्वजारोहण पुढील वर्षी होणार असून त्यानंतर देशभरातून साधू महंत नाशिकमध्ये दाखल होण्यास सुरुवात होईल. तत्पुर्वी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधूग्रामच्या भूसंपादनाचा विषय ऐरणीवर आला. त्याअनुषंगाने कुंभमेळा मंत्री गिरिश महाजन यांनी ५०० एकर जागा अधिग्रहीत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

भाडेतत्वार जागा घेतली जाणार
तपोवन (Tapovan) परिसरात ३५० एकर जमीन सिंहस्थासाठी कायमस्वरुपी आरक्षित करण्यात आली आहे. मात्र यंदा साधूग्रामसाठी २०० एकर अतिरिक्त जागा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी तपोवनाच्या आजूबाजूच्या आडगाव, मखमलाबाद, मेरी या भागातील जमिनिंचा पर्याय मनपासमोर आहे. त्यासाठी मनपा व जिल्हा प्रशासनाने आजूबाजूच्या जागा भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील शेतकरी व जागा मालकांनी तयारी दर्शवल्यास त्यांना जागा वापराचे भाडे देण्यात येणार आहे.

(हेही वाचा – ICSE 10th Exam Results : धारावीतील युवश्री सर्वाननने मिळवले ९३.०२ टक्के गुण)

हे रस्ते होणार गुळगुळीत
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात २ हजार २७० कोटींचा निधी वापरुन रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता काँक्रिटीकरण व सहापदरी, पालखी मार्ग, नाशिक दिंडोरी वणी नांदुरी रस्ता रुंदीकरण, नाशिक दिंडोरी रस्त्यावरील उनंदा नदीवरील पुल, दुगाव ते जऊळके त्र्यंबकेश्वर रस्ता, जानोरी-ओझर रस्ता, भरवीर-टाकेद-बैज रस्ता, चिंचोली-वडगाव-पिंगळा विंचूर दळवी-पांढुर्ली रस्ता, वाडीवऱ्हे-दहेगाव-जातेगाव-तळेगाव-महिरावणी-दुडगाव-गणेशगाव रस्ता, दुगाव-ढकांबे-जऊळके रस्ता, शिडी-राहता-बाह्यवळण रस्ता, त्र्यंबकेश्वर-तुपादेवी-तळवाडे-उमराळे-दिंडोरी-पालखेड-जोपुळ-पिंपळगाव रस्ता, दुगाव-जुने घागुर-ढकांबे-आंबे-दिंडोरी-जऊळके रस्ता, पेठ-तोरंगण-हरसुल-वाघेरा-अंबोली-पहिने-घोटी रस्ता, जानोरी-नाशिक विमानतळ रस्ता, आडगाव-गिरणारे-वाघेरा-हरसुल- ओझरखेड रस्ता, त्र्यंबक-देवगाव-खोडाळा या रस्त्यांबरोबरच इतर कामे १७ कोटींची कामे केली हाती घेण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, उपजिल्हाधिकारी भारदे, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रेया देवचक्के यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.