मीरा-भाईंदरमध्ये लवकरच Air taxi सेवा; वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा

67
मीरा-भाईंदरमध्ये लवकरच Air taxi सेवा; वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा
  • प्रतिनिधी

मुंबई लगतच्या मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात लवकरच हवाई टॅक्सी (Air taxi) सेवा सुरू होणार असून, या प्रकल्पासाठी महापालिकेने संबंधित संस्थेला सर्वेक्षण व आवश्यक परवानग्यांची मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

(हेही वाचा – मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा वर्षा बंगल्यात गृहप्रवेश ; अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सपत्नीक गृहप्रवेश)

शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि मेट्रोला पूरक वाहतूक पर्याय देण्यासाठी हवाई टॅक्सी (Air taxi) उपयुक्त ठरेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. डिसेंबर 2025 मध्ये मीरा-भाईंदर शहर मेट्रो मार्गिकेवर येणार असून, हवाई टॅक्सीमुळे नागरिकांना जलद व सुलभ प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.

(हेही वाचा – सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचा Khaki Uniform; 1 मेपासून अंमलबजावणी)

घोडबंदर किल्ला, उत्तनचा सागरी परिसर, कांदळवन उद्यान यांसारख्या पर्यटन स्थळांसोबतच नव्या प्रकल्पांची जोड हवाई टॅक्सी (Air taxi) मुळे मिळणार आहे. गुजरातमधील वडोदऱ्यात हवाई टॅक्सीचा यशस्वी प्रायोगिक प्रकल्प राबवला जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. हा प्रकल्प जे. पी. इन्फ्रास्ट्रक्चरसमोरील जागेत उभारण्यात येणार असून, शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.