Indore Muslim Patient : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर इंदौरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल; म्हणाले…

732

Indore Muslim Patient : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam terrorist attack) २२ एप्रिलला आतंकवादी हल्ला झाला. या आतंकवादी हल्ल्यात निष्पाप २६ जणांना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर देशभरात संतपाची लात उसळली आहे. दरम्यान इंदौरच्या एका डॉक्टराची व्हॉट्सअप चॅटचा (Indore Doctor WhatsApp Screenchat) स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये संबंधित महिला डॉक्टराने मुस्लीम रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला. (Indore Muslim Patient)

(हेही वाचा – Osama on Pakistan : पाकिस्तानी नागरिक ओसामाकडे भारताचं आधार- रेशन कार्ड ; निवडणुकीतही मतदान केलं ? वाचा संपूर्ण प्रकरण …)

महिला डॉ. नेहा अरोरा वर्मा (Dr. Neha Arora Verma indore ) यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये इंदूर येथील एका डॉक्टरने गुडघ्यांवर उपचार घेणाऱ्या मुस्लिम महिला रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला. स्क्रीनशॉटनुसार, डॉक्टर स्पष्टपणे म्हणतात की, आम्ही आता कोणत्याही मुस्लिम रुग्णांवर उपचार करणार नाही. कृपया तुमच्या परिसरातील चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्या.’ हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. हा मेसेज रुग्णाच्या धर्माला लक्ष्य करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. नेटकऱ्यांचा संताप पाहून डॉ. नेहा यांनी पोस्ट डिलिट केली. परंतु, तोपर्यंत हा स्क्रीनशॉट वेगाने व्हायरल झाला. आरोग्य अधिकारी किंवा स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.