BMC : नालेसफाईच्या कामात आयुक्तांना जनतेकडून आहे मोठी अपेक्षा; थेट केले ‘हे’ आवाहन

431
BMC : नालेसफाईच्या कामात आयुक्तांना जनतेकडून आहे मोठी अपेक्षा; थेट केले 'हे' आवाहन
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील अनेक छोट्या मोठ्या नाल्यांमध्ये नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. अनेक भागातील नाले नियमितपणे स्वच्छ केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. मुंबईकर नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा न टाकता तो कचरा कुंडीतच टाकावा. जेणेकरुन कचरा अडकून नाले तुंबणार नाहीत, पाण्‍याचा प्रवाह सुरळीत सुरू राहिल, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे. (BMC)

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील नदी व मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पश्चिम उपनगरातील विविध ठिकाणांना मंगळवारी २९ एप्रिल २०२५ रोजी भेट दिली. तसेच, नदी व नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करत संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले. पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे संबंधित अधिकारी दौऱ्याला उपस्थित होते. (BMC)

New Project 2025 04 29T150303.181

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : “ऑपरेटरने तीनवेळा ‘अल्लाहू अकबर’ म्हटलं अन्…”, ऋषी भट्ट यांनी NIA ला सांगितला घडलेला थरार, झिपलाइन ऑपरेटरची चौकशी सुरू)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महानगरपालिका आयुक्‍त भूषण गगराणी म्‍हणाले की, नालेस्‍वच्‍छतेची, गाळ काढण्‍याची कामे समाधानकारकरित्या होत असली तरी आजूबाजूच्या वस्‍त्‍यांमधील नागरिक प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तू नाल्यांमध्ये टाकतात. नाल्‍याच्‍या दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांनी, मुंबईकर नागरिकांनी नाल्यांत घनकचरा, टाकाऊ वस्‍तू, प्‍लास्टिक वस्‍तू टाकू नयेत. महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन गगराणी यांनी केले. (BMC)

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी म्‍हणाले की, नाल्यांतून गाळ काढण्याच्या पावसाळा पूर्व उद्दिष्टापैकी ४३ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित एक महिन्याच्या कालावधीत गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण केली जातील. गाळ काढण्याच्या कामात यंदा अधिक पारदर्शकता आणली आहे. गाळ उपसा संदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व चित्रफीतींचे (व्हिडिओ) कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाकडून विश्लेषण केले जात आहे. त्यानिमित्ताने या कामांमध्ये पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. त्याद्वारे नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होत आहे, अशी माहिती गगराणी यांनी दिली. पावसाळ्यात पूर नियंत्रण झडपा, उदंचन संयंत्रे कार्यरत राहतील, याची दक्षता घेण्‍याचे निर्देश संंबंधितांना दिले आहेत. सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही याचे नियोजन केले आहे. हे सगळे नियोजन पावसाची विशिष्ट स्थिती लक्षात घेऊन केले आहे, असे गगराणी यांनी नमूद केले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.