
भेंडी ही एक अतिशय पौष्टिक भाजी आहे. भेंडी जगाच्या अनेक भागांमध्ये विशेषतः समशीतोष्ण किंवा उष्णकटिबंधीय हवामान असलेल्या ठिकाणी पिकवली जाते. भेंडीची भाजी भारतीय घरांमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. तरी आपल्यापैकी अनेकांना भेंडीची भाजी खाण्याचे अनेक फायदे माहिती नसतील. भेंडी ही अतिरिक्त वजन कमी करण्यास उपयोगी पडते. याव्यतिरिक्त भेंडीचे इतरही अनेक फायदे आहेत, जे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (bhindi health benefits)
भेंडीमध्ये असलेले पौष्टिक घटक
१०० ग्रॅम भेंडीमध्ये ७.०३ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, २ ग्रॅम प्रथिने, ०.१ ग्रॅम फॅट आणि ९% फायबर असतं. तसंच त्यामध्ये फोलेट, नियासिन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के हेही भरपूर प्रमाणात असतं. याव्यतिरिक्त भेंडीमध्ये कॅल्शियम, तांबे, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस आणि जस्त देखील भरपूर प्रमाणात असतं. (bhindi health benefits)
(हेही वाचा – Kamala Nehru Park : १६०० चौरस मीटर क्षेत्रात पसरलेल्या कमला नेहरु पार्कमध्ये कधी गेला आहात का? मन शांत करण्याचं आहे ठिकाण!)
भेंडीचे काही आरोग्यदायी फायदे
-
हृदयाचं आरोग्य वाढवते
भेंडीमध्ये कोलेस्ट्रॉल नसतं. त्याऐवजी पेक्टिन नावाचा घटक असतो. हा घटक वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. वाईट कोलेस्ट्रॉल वाढणं हे हृदयरोगांचं कारण आहे. म्हणून जेवणात भेंडीचा वापर वाढवून हृदयरोगावर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं.
-
रक्तातली साखर नियंत्रित राहते
मधुमेहाच्या रुग्णांसाठी भिंडी हा एक उत्तम पर्याय आहे. कारण त्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि रक्तातली साखर हळूहळू बाहेर पडते. यामुळे मधुमेही व्यक्तीने अन्नाचं सेवन केल्यानंतर साखरेची वाढ होत नाही.
-
कर्करोगाशी लढते
संशोधनातून असं कळून आलं आहे की, इतर भाज्यांच्या तुलनेत भेंडीमध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त असतं. अँटीऑक्सिडंट्स हे पेशींना होणारे ऑक्सिडेटिव्ह नुकसान रोखतात आणि त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. उच्च फायबरयुक्त पदार्थ निरोगी पचनसंस्था राखतात आणि कोलन कर्करोग होण्यापासून रोखतात.
-
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सामान्य संसर्ग रोखला जातो. (bhindi health benefits)
(हेही वाचा – Bajaj Chetak 3503 : संपूर्ण पोलादाची बनलेली बजाजची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय रस्त्यांवर)
-
अशक्तपणाला प्रतिबंधक असते
भेंडीमध्ये व्हिटॅमिन के, फोलेट आणि लोह हे जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरात रक्त शुद्धीकरण होण्यास आणि रक्तवाढ मदत मिळते. त्यामुळे अशक्तपणा येत नाही.
-
वजन कमी करण्यास मदत करते
प्रत्येक १०० ग्रॅम एवढ्या भेंडीमध्ये फक्त ३३ कॅलरीज असतात. म्हणून भेंडी ही वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. उच्च फायबर असल्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि कॅलरीजचं सेवन आपोआपच कमी होतं.
-
कोलन कर्करोग प्रतिबंधित होतो
भेंडीमध्ये अघुलनशील फायबरचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे संपूर्ण पचनसंस्था विशेषतः आतड्यांचा मार्ग स्वच्छ करण्यास मदत होते. भेंडी ही आतडे निरोगी ठेवण्यात आणि कोलन कर्करोग रोखण्यात मोठी भूमिका बजावते.
-
गरोदरपणात फायदेशीर असते
फोलेट किंवा फॉलिक ऍसिड हे गर्भधारणेसाठी आणि त्यानंतर भ्रूणाच्या विकासासाठी अतिशय आवश्यक असलेलं एक महत्त्वाचं खनिज आहे. भेंडीमध्ये फोलेटचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे बाळाचा योग्य न्यूरोलॉजिकल विकास होण्यास मदत मिळते. (bhindi health benefits)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community