Kamala Nehru Park : १६०० चौरस मीटर क्षेत्रात पसरलेल्या कमला नेहरु पार्कमध्ये कधी गेला आहात का? मन शांत करण्याचं आहे ठिकाण!

64
Kamala Nehru Park : १६०० चौरस मीटर क्षेत्रात पसरलेल्या कमला नेहरु पार्कमध्ये कधी गेला आहात का? मन शांत करण्याचं आहे ठिकाण!

कमला नेहरू पार्कची स्थापना १९५२ साली करण्यात आली होती. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने २२ फेब्रुवारी २०१८ साली या उद्यानाचे पुनरुज्जीवन करून ते लोकांसाठी खुलं केलं. कमला नेहरू पार्क या उद्यानात समुद्रकिनाऱ्यावरची विस्तीर्ण दृश्ये, रंगीबेरंगी फुलांची आरास आणि एका प्रसिद्ध नर्सरी राइमने प्रेरित असलेलं मुलांसाठी खेळाचे मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. (Kamala Nehru Park)

मुंबई शहरातील रस्त्यांच्या गजबजाटातून विश्रांती घेण्यासाठी तुम्ही कमला नेहरू पार्कच्या निसर्गरम्य परिसरात आराम करू शकता. तसंच सुंदर सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. कमला नेहरू पार्क हे मलबार हिलच्या उतारावर वसलेलं एक उद्यान आहे. या उद्यानासमोर भला मोठा अरबी समुद्र दिसतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नीच्या नावावरून या उद्यानाचं नाव ठेवण्यात आलं आहे. (Kamala Nehru Park)

(हेही वाचा – Bajaj Chetak 3503 : संपूर्ण पोलादाची बनलेली बजाजची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय रस्त्यांवर)

उद्यानाच्या झाडांच्या सावलीत असलेल्या वॉक वे वरून तुम्ही फिरू शकता. इथे असलेल्या अशोकस्तंभावर बारीक कोरीव काम केलेलं आहे. तसंच इथं एक भला मोठा बूट तयार केलेला आहे. त्याला म्हातारीचा बूट असं म्हणतात. लहान मुलं या बुटात जाऊन खेळू शकतात. उद्यानाच्या परिसरातून जवळच असलेल्या गिरगाव चौपाटी आणि बॅक बे चं उत्कृष्ट दृश्य दिसतं. सूर्यास्त पाहण्यासाठी इथे पर्यटकांची भरपूर गर्दी जमते. त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील प्रॉमेनेड, मरीन ड्राइव्ह, तेजस्वी दिव्यांच्या मालिकेने प्रकाशित होताना दिसतो. इथले स्थानिक लोक त्याला क्वीन्स नेकलेस असं म्हणतात. कारण हे दिवे मोत्यांच्या हारासारखेच दिसतात. (Kamala Nehru Park)

कमला नेहरू पार्क हे पर्यटकांसाठी दररोज खुलं असतं. इथे प्रवेशही मोफत आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून हे उद्यान २० मिनिटांच्या अंतरावर आहे. या उद्यानात जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कमी किमतीच्या ऑटो-रिक्षा आणि टॅक्सीने जाणं होय. याव्यतिरिक्त तुम्ही चर्नी रोड रेल्वे स्टेशनला जाऊन तिथून चालत जाऊ शकता. वीस मिनिटे चालण्याच्या अंतरावर हे उद्यान आहे. जर तुम्हाला चालायला खूप आवडत असेल, तर मरीन ड्राइव्हवरून चालत जाऊ शकता आणि सी-वॉकचा आनंद घेऊ शकता. (Kamala Nehru Park)

(हेही वाचा – English Premier League : लिव्हरपूलला २० वे प्रिमिअर लीग विजेतेपद, मँचेस्टर युनायटेडशी बरोबरी)

येथे असताना मलबार हिल परिसरात असलेल्या इतर आकर्षणांनाही तुम्ही भेट देऊ शकता. जसं की, हँगिंग गार्डन्समध्ये प्राण्यांच्या आकाराची झाडे आणि टोपियरी कला पाहता येईल. १२ व्या शतकातल्या बाणगंगा तलावाच्या पवित्र पाण्यात स्नान करणाऱ्या भाविकांना पाहण्यासाठी वाळकेश्वर मंदिरातही तुम्ही जाऊ शकता. याव्यतिरिक्त गिरगाव चौपाटीवर सर्पमित्रांना पाहू शकता आणि स्वादिष्ट स्ट्रीट फूडचा आस्वादही घेऊ शकता. (Kamala Nehru Park)

कमला नेहरू पार्क हे हँगिंग गार्डन्स कॉम्प्लेक्सचाच एक भाग आहे. हे उद्यान अंदाजे १६,००० चौरस मीटर म्हणजेच ४ एकर एवढं क्षेत्र व्यापते. मुंबईच्या मलबार हिलच्या वरच्या बाजूला असलेले हे पार्क आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हायड्रॉलिक इंजिनिअर विभागाद्वारे हे पार्क विकसित केलं जातं आणि त्याची निगा राखली जाते. मुंबईतल्या प्रमुख उद्यानांपैकी एक असलेलं हे पार्क लहान मुलं आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. (Kamala Nehru Park)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.