MHADA पारदर्शकतेच्या मार्गावर; आता टपाल स्वीकारणार नाही तर स्कॅन करणार

308
MHADA पारदर्शकतेच्या मार्गावर; आता टपाल स्वीकारणार नाही तर स्कॅन करणार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

म्हाडाच्या (MHADA) कारभारात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने आता पाऊल टाकण्यात येत असून आता म्हाडात टपाल देण्यासाठी रांग लावण्याची गरज लागणार नाही. नागरिकांनी आणलेले टपाल स्वीकारण्यासाठी एकूण १८ काउंटर तयार करण्यात आलेले आहेत. या काउंटरवर टोकन नंबर व नागरिकांनी आणलेले कागदपत्र तात्काळ स्कॅन करून मूळ प्रत नागरिकांना परत केली जाणार आहे. कागदपत्रांची स्कॅन प्रत संबंधित विभागाला पाठविली जाणार आहे. यानंतर नागरिकांना कागदपत्र स्वीकारल्याची पोचपावती दिली जाणार आहे. नागरिकाला मोबाईलवर आलेल्या एसएमएस वर आपण जमा केलेले टपाल कुठल्या कार्यालयात पोहोचले याची माहिती ट्रेकिंग सिस्टीमद्वारे मिळणार आहे.

म्हाडा (MHADA) मुख्यालयाच्या गेट नंबर चारवर उभारण्यात आलेल्या वातानुकूलित, अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त या सुविधा केंद्रामध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी किऑस्क (Kiosk) मशीन बसवण्यात आलेले आहेत. या मशीनवर मराठी व इंग्रजी भाषेत माहिती सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. नागरिक सुविधा केंद्रात आल्यावर नागरिकांनी या मशीनवर सर्वप्रथम नाव व आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. नागरिकांनी नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाणार असून सदर ओटीपी मशीनमध्ये टाकल्यानंतर टोकन जनरेट होणार आहे. टोकन जनरेट झाल्यावर नागरिकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर तसा एसएमएस तात्काळ प्राप्त होणार आहे.

New Project 2025 04 28T204320.758

(हेही वाचा – MHADA च्या सुमारे पाच हजार घरांची येत्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये संगणकीय सोडत; कारभारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न)

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उभारण्यात आलेल्या म्हाडा नागरिक सुविधा केंद्र (Citizen Facilitation Center), अभ्यांगत व्यवस्थापन प्रणाली (Visitors Management System), कार्यालय शोधक (Office Locator) या सुविधा व म्हाडाचे नवीन व अद्ययावत संकेतस्थळ, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष यांचे उद्घाटन ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

नागरिकाला म्हाडा (MHADA) कार्यालयात द्यावयाचे टपाल दोन काउंटरवर दाखवायचे आहे. या दोन्ही काउंटरवर एकूण चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सदर कर्मचारी हे टपाल कुठल्या कार्यालयात द्यावयाचे आहे याबाबत पडताळणी करतील. या पडताळणी केल्यानंतर ज्या कार्यालयास हे टपाल द्यावयाचे आहे त्याची नोंद या टपालावर केली जाईल. त्यानंतर नागरिकाला केंद्रातील वातानुकूलित प्रतिक्षालयामध्ये बसण्याची व्यवस्था केली आहे. या प्रतीक्षालयामध्ये २७ नागरिक एका वेळी बसू शकतात. प्रतीक्षालयात टीव्ही स्क्रीनवर नागरिकांना देण्यात आलेला टोकन नंबर त्यांना ज्या काउंटरवर जायचे आहे त्या काउंटरच्या क्रमांकासह प्रदर्शित केला जाणार आहे. नागरिक सुविधा केंद्रात १८ काउंटरवर प्रत्येकी एक कर्मचारी, स्वागतालयात दोन कर्मचारी कर्मचारी, एक प्रकल्प व्यवस्थापक, एक फ्लोअर व्यवस्थापक कार्यरत असणार आहेत. काउंट वर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

(हेही वाचा – पोलिसांकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर आकसापोटी कारवाई; विहिंप Police आयुक्तालयावर काढणार मोर्चा)

अभ्यांगत व्यवस्थापन प्रणाली

अभ्यांगत व्यवस्थापन प्रणालीमुळे म्हाडाच्या प्रवेशद्वारावर होणारी गर्दी कमी होणार असून नागरिकांना आता रांगा लावण्याची गरज नाही. या प्रणालीत अभ्यांगताचा चेहरा ओळखणे (Facial Recognition) तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार असून नागरिकांना त्रासमुक्त प्रवेश मिळणार आहे. म्हाडाच्या (MHADA) प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक अभ्यांगतांचे फोटो ओळखपत्र स्कॅन करून त्यांचे छायाचित्र मोबाईलमध्ये काढणार आहेत. ही प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना तात्काळ प्रवेश पत्र दिले जाणार आहे. अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी डीजीप्रवेश ॲपमध्ये नोंदणी करावयाची आहे. नोंदणी करतेवेळी डिजिलॉकरमधील आधार कार्डची पडताळणी करायची असून स्वतःचे छायाचित्र अपलोड करायचे आहे. त्यात ज्या अधिकाऱ्यांना भेटायचे आहे त्यांचे नाव, भेटण्याची दिनांक व वेळ नमूद करायची आहे. अधिकाऱ्यांच्या वेळेनुसार अभ्यांगताना प्रवेशपत्र ऑनलाइन या ॲपवरच वितरित होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.