FIIs Return to India : गेल्या आठवड्यात परकीय गुंतवणूकदारांनी केली १७,४२५ कोटींची खरेदी

FIIs Return to India : २०२५ मध्ये परकीय गुंतवणूकदारांनी १.२ लाख कोटी रुपये काढून घेतले होते.

140
FIIs Return to India : गेल्या आठवड्यात परकीय गुंतवणूकदारांनी केली १७,४२५ कोटींची खरेदी
  • ऋजुता लुकतुके

२०२५ सालाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी खराब झाली होती. याला मुख्य कारण परकीय गुंतवणूकदार संस्थांनी भारतात केलेली अफाट विक्री हे होतं. आकडाच सांगायचा झाला तर एप्रिल २०२५ पर्यंत परकीय संस्थांनी एकूण १.२ लाख कोटी रुपये काढून घेतले. पण, आता व्यापारी युद्धाची भीती कमी झाल्यानंतर संस्था परत शेअर बाजाराकडे वळताना दिसत आहेत. सलग दुसऱ्या आठवड्यात खरेदीचा जोर लावल्यामुळे भारतीय शेअर बाजारही हिरव्या रंगात दिसत आहेत. २१ ते २५ एप्रिलच्या पाच दिंवसांत या संस्थांनी भारतीय शेअर बाजारांत १६,४२५ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. सतत दुसऱ्या आठवड्यात गुंतणूक वाढताना दिसत आहे. एप्रिलच्या तिसऱ्या व्यापार आठवड्यात (१५-१७ एप्रिल) देखील ८,४७२ कोटी रुपयांची खरेदी झाली. अशाप्रकारे, गेल्या २ व्यावसायिक आठवड्यात बाजारात २५,८९७ कोटी रुपयांची खरेदी झाली आहे. (FIIs Return to India)

(हेही वाचा – मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा कॉंग्रेसच्या नेत्यावर पलटवार; म्हणाले, ‘जखमेवर मीठ चोळायची कामे करू नका’   )

त्याच वेळी, २०२५ च्या सुरुवातीपासून, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून १.२ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी या पहिल्या दोन महिन्यांत, एफआयआयनी अनुक्रमे ७८,०२७ आणि ३४,५७४ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. मार्चमध्ये ३,९७३ कोटी रुपयांची विक्री झाली. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांच्या नवीन आयात शुल्कवाढीच्या धोरणामुळे बाजारपेठेतील अनिश्चितता, जागतिक मंदी, भारतीय शेअर्सचे उच्च मूल्यांकन आणि कॉर्पोरेट उत्पन्नातील वाढीच्या चिंतेमुळे एफआयआय सतत पैसे काढत होते. (FIIs Return to India)

(हेही वाचा – भारताने फ्रान्ससोबत २६ Rafale Aircraft खरेदीच्या करारावर केली स्वाक्षरी)

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी परकीय संस्थांची खरेदी विक्रीच्या तुलनेत जास्त होती. त्याच वेळी, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार खरेदीचं प्रमाण वाढवलं. राष्ट्रीय शेअर बाजाराकडून आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २५ एप्रिल रोजी, परकीय संस्थांनी २,९५२.३३ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, तर डीआयआयने ३,५३९.८५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. परकीय संस्थांनी १६,१७०.७२ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आणि १२,६३०.८७ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर एफआयआयने १५,५२४.०३ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आणि १२,५७१.७० कोटी रुपयांचे शेअर्स विकले. (FIIs Return to India)

प्रकार खरेदी मूल्य विक्री मूल्य नेट मूल्य
देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) १६,१७०.७२ १२,६३०.८७ ३,५३९.८५
परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) १५,५२४.०३ १२,५७१.७० २,९५२.३३

 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या ९० दिवसांच्या तात्पुरत्या कर सवलतीमुळे भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार चर्चेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या निर्णयांमुळे, गेल्या २ व्यावसायिक आठवड्यात परकीय गुंतवणूकदारांनी २५,८९७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. (FIIs Return to India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.