Earthquake In Palghar : पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट

Earthquake In Palghar : कोणतीही जिवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची वृत्त नसले तरी नागरिकांमध्ये घबराट आहे.

227

पालघर (Palghar) पुन्हा एका भूकंपाच्या धक्क्यांनी हदरली आहे. पालघरमधील डहाणू (Dahanu) तलासरी भागात रविवार, २७ एप्रिल या दिवशी संध्याकाळी ७ वाजून २३ मिनिटांच्या सुमारास सौम्य धक्के जाणवले आहे. (Earthquake In Palghar) या धक्क्यामुळे कोणतीही जिवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची वृत्त नसले तरी नागरिकांमध्ये घबराट आहे.

(हेही वाचा – Pahalgam Attack Update: पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रेल्वेच्या सुरक्षेत वाढ)

रविवारी रात्री अचानक डहाणू आणि परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. काही सेकंदासाठी जमीन हादरली त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली, घराबाहेर पळ काढला होता. दरम्यान, पालघर आणि परिसरात मागील अनेक महिन्यांपासून भूकंपाचे हादरे जाणवत आहेत.

२०१८ पासून पालघर आणि परिसरामध्ये सतत भूकंपाचे लहान-मोठे हादरे बसत आहेत. याआधी ७ जानेवारी २०२५ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास डहाणू, तलासरी, बोर्डी, दापचरी, धुंदलवाडी, चिंचले, हळदपाडा येथे ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचे तीन धक्के जाणवले होते. ३१ डिसेंबर २०२४, ऑगस्ट आणि ऑक्टोबर २०२४ मध्येही डहाणू परिसरात सौम्य धक्के जाणवले होते. (Earthquake In Palghar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.