Pahalgam Attack च्या निषेधार्थ आरजेडीच्या मोर्चात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

बिहार भाजपने या व्हिडिओवर टीका केली आणि म्हटले की राजदचा खरा चेहरा उघड झाला आहे.

139

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) २८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण देश शोकाकुल आहे. मंगळवारी, २२ एप्रिल २०२५ ला देशभरात घडलेल्या या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, बिहारमधील लखीसराय येथे आरजेडीच्या रॅलीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

 

विशेष म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या (Pahalgam Attack) निषेधासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता, परंतु दहशतवादाला पोसणाऱ्या इस्लामिक देशाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.

(हेही वाचा Pahalgam Attack : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे पाक धार्जिणे वक्तव्य; पाकिस्तान माध्यमांनी केला वापर)

आता राजदचे जिल्हाध्यक्ष कालीचरण दास म्हणत आहेत की हे नारे चुकून देण्यात आले होते. सुरुवातीला त्यांनी घोषणा दिल्याचे मान्य करण्यास नकार दिला, परंतु टीकेला सामोरे जाल्यानंतर त्यांनी सांगितले की मेणबत्ती मोर्चा दरम्यान चुकून घोषणा देण्यात आल्या. त्यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने ही घोषणा दिली आहे त्याच्यावर पक्ष कारवाई करेल, त्यांनी माफीही मागितली आहे. राजद जिल्हाध्यक्ष म्हणाले की, ‘हिंदुस्तान’ ऐवजी ‘पाकिस्तान’ हा शब्द चुकून उच्चारण्यात आला. बिहार भाजपने या व्हिडिओवर टीका केली आणि म्हटले की राजदचा खरा चेहरा उघड झाला आहे. हे प्रकरण सूर्यगढ विधानसभा मतदारसंघाशी संबंधित आहे, जिथे कालीचरण दास यांच्याव्यतिरिक्त, आरजेडी जिल्हा उपाध्यक्ष प्रेमसागर यादव देखील उपस्थित होते. त (Pahalgam Attack)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.