Mumbai BEST Bus : बेस्ट बसचे तिकीट अखेर दुप्पट, महापालिकेने दिली मंजुरी! तात्काळ होणार अंमलबजावणी

3627
Mumbai BEST Bus : बेस्ट बसचे तिकीट अखेर दुप्पट, महापालिकेने दिली मंजुरी! तात्काळ होणार अंमलबजावणी
Mumbai BEST Bus : बेस्ट बसचे तिकीट अखेर दुप्पट, महापालिकेने दिली मंजुरी! तात्काळ होणार अंमलबजावणी

सचिन धानजी, मुंबई

तोट्यात चाललेल्या बेस्ट (Mumbai BEST Bus) उपक्रमाला आता बस तिकीट दरवाढीला अखेर मान्यता मिळाली असून यामध्ये बसचे तिकीट आता दुपटीने वाढवण्याच्या बेस्टच्या प्रस्तावाला महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सध्या साध्या बसेसाठी किमान आकारले जाणारे बस भाडे आता पाच रुपयांऐवजी दहा रुपये आकारले जाणार आहे, तर वातानुकूलित बसेसचे किमान भाडे सहा रुपयांवरून बारा रुपये एवढे आकारले जाणार आहे. महापालिकेने या तिकीट दरवाढीला मंजुरी दिल्याने याची अंमलबजावणी तात्काळ केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता बेस्ट बस प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार असून यामुळे जमा होणाऱ्या चिल्लरची समस्या मिटून बेस्टच्या महसूलात वाढ होणार आहे. त्यामुळे तोट्यात चाललेल्या या बेस्टसाठी तिकीट दरवाढ ही दिलासा दायक असली तरी मुंबईकरांना काही दिवस नाक मुरडत का होईना यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे. (Mumbai BEST Bus)

बेस्ट उपक्रम (Mumbai BEST Bus) तोट्यात असल्याने महापालिकेच्यावतीने आर्थिक मदत केली जाते. परंतु महापालिकेच्या आर्थिक मदतीवर बेस्टचे भरकटणारे तारु स्थिर होण्याची शक्यता नसल्याने महसूल वाढीसाठी त्यांना विविध उपाययोजना करण्याची गरज होती. त्यातून बेस्ट बस तिकीट दरवाढीचा पर्याय समोर आला होता, मागील फेब्रुवारी महिन्यात याबाबतचा आढावा घेतल्यानंतर बेस्टचे प्रभारी महाव्यवस्थापक एसव्हीआर श्रीनिवासन यांनी तिकीट दरवाढीचे सुतोवाच केले होते. त्यानुसार त्यांनी बस तिकीट दरवाढीचा प्रस्ताव बेस्ट समितीच्यावतीने मंजूर करून महापालिका प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या प्रस्तावाला प्रशासक (महापालिका) म्हणून महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. (Mumbai BEST Bus)

या मंजुरीनंतर याची तात्काळ अंमलबजावणी केली जाणार असून येत्या दिवसांतच वाढीव दराप्रमाणे तिकीट दर आकारले प्रवाशांना आकारले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे सवलतीच्या भाड्यात कुठेही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थी, पत्रकार, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आदींसाठी असलेल्या सवलतीतील प्रवासाचे तिकीट दर कायम ठेवण्यात आला आहे. (Mumbai BEST Bus)

बस भाड्यामध्ये किमान पाच रुपये आणि उर्वरीत प्रवास भाड्यांत टप्प्यानुसार भाडे वाढ करण्यास मंजुरी मिळाल्याने या भाडेवाढीमुळे बेस्टच्या तिजोरीत सुमारे ५९० कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. सध्या बेस्टचे सुमारे ३० हजार प्रवाशी असून त्यांच्या प्रवासी तिकीटांमधून वर्षाला ८४५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. त्यामुळे या तिकीट दरात वाढ केल्याने वार्षिक उत्पन्न सुमारे १४०० कोटी रुपयांवर पोहोचले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Mumbai BEST Bus)

विना वातानुकूलित बसेसचे भाडे

कि.मी सध्याचे भाडे वाढीव भाडे

५ —– –५ रुपये—— -१० रुपये

१०——- १०रुपये—— -१५ रुपये

१५——- १५रुपये—— -२० रुपये

२०——- २०रुपये—— -३०रुपये

२५——- २०रुपये—— -३५रुपये

 

वातानुकूलित बसेसचे भाडे

कि.मी सध्याचे भाडे वाढीव भाडे

५ —– –६ रुपये—— -१२ रुपये

१०——- १३रुपये—— -२०रुपये

१५——- १९रुपये—— -३०रुपये

२०——- २५रुपये—— -३५रुपये

२५——- २५रुपये—— -४०रुपये

 

मासिक बस पास

५ किलोमीटर अंतरासाठी ३०० रुपये होता, त्यात वाढ होवून ५०० रुपये

१० किलोमीटर अंतरासाठी ७००रुपये होता, त्यात वाढ होवून ८००रुपये

१५ किलोमीटर अंतरासाठी १०५०रुपये होता, त्यात वाढ होवून ११००रुपये

२०किलोमीटर अंतरासाठी १३५०रुपये होता, त्यात वाढ होवून १७००रुपये

 

मासिक बस पास

५ किलोमीटर अंतरासाठी ४५० रुपये होता, त्यात वाढ होवून ८०० रुपये

१० किलोमीटर अंतरासाठी १००० रुपये होता, त्यात वाढ होवून १२५०रुपये

१५ किलोमीटर अंतरासाठी १६५०रुपये होता, त्यात वाढ होवून १७००रुपये

२०किलोमीटर अंतरासाठी २२००रुपये होता, त्यात वाढ होवून २६०० रुपये

 

मासिक बस पास

५ किलोमीटर अंतरासाठी ६०० रुपये होता, त्यात वाढ होवून ११०० रुपये

१० किलोमीटर अंतरासाठी १४०० रुपये होता, त्यात वाढ होवून १७००रुपये

१५ किलोमीटर अंतरासाठी २१०० रुपये होता, त्यात वाढ होवून २३०० रुपये

२०किलोमीटर अंतरासाठी २७००रुपये होता, त्यात वाढ होवून ३५०० रुपये

साप्ताहिक बस पास

५ किलोमीटर अंतरासाठी ७० रुपये होता, त्यात वाढ होवून १४० रुपये

१० किलोमीटर अंतरासाठी १७५ रुपये होता, त्यात वाढ होवून २१० रुपये

१५ किलोमीटर अंतरासाठी २६५ रुपये होता, त्यात वाढ होवून २८० रुपये

२०किलोमीटर अंतरासाठी ३५० रुपये होता, त्यात वाढ होवून ४२० रुपये

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.