Pahalgam Attack चा भगूरमध्ये निषेध; मृत भारतीय नागरिकांना वाहिली श्रद्धांजली

नागरिकांनी "भारत माता की जय," "वंदे मातरम," "पाकिस्तानचा धिक्कार असो," "पाक मुर्दाबाद," अशा घोषणांनी चौक दणाणून सोडला. यावेळी पाकिस्तानचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

52

स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Attack) निषेध करण्यासाठी ग्रामस्थ आणि विविध पक्षांच्या नागरिकांनी छत्रपती शिवाजी चौकात एकत्र येत निषेध आंदोलन केले. या घटनेत मृत पावलेल्या भारतीय पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

नागरिकांनी “भारत माता की जय,” “वंदे मातरम,” “पाकिस्तानचा धिक्कार असो,” “पाक मुर्दाबाद,” अशा घोषणांनी चौक दणाणून सोडला. यावेळी पाकिस्तानचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. शोकसभेत नागरिकांनी केंद्र शासनाकडे मागणी केली की, या हल्ल्यास (Pahalgam Attack) जबाबदार असलेल्या अतिरेकी संघटनांवर कठोर कारवाई करावी.
bhagur 1
या आंदोलनात मधुकर कापसे, सुभाष जाधव, संग्राम गायकवाड, मनोज कुवर, काकासाहेब देशमुख, विक्रम सोनवणे, प्रसाद आडके, विशाल बलकवडे, प्रताप गायकवाड, हनुमंतराव देशमुख, मृत्युंजय कापसे, उत्तम करंजकर, अनाजी कापसे, संजय जाधव, प्रकाश सुराणा, शशिकांत देशमुख, पंडित हरक, जयवंत करंजकर, निलेश हासे, लक्ष्मण देशमुख, राजेंद्र मुंदडा, पांडुरंग ओहोळ, संभाजी देशमुख यांसह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.