Bangladeshi Infiltrator : सुरत, अहमदाबादमध्ये घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई ! ५०० हून अधिक बांगलादेशी ताब्यात

Bangladeshi Infiltrator : सुरत, अहमदाबादमध्ये घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई ! ५०० हून अधिक बांगलादेशी ताब्यात

112

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुजरात सरकारने घुसखोरांविरुद्ध (Bangladeshi Infiltrator) मोठी कारवाई केली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी अहमदाबाद आणि सुरतमधील अनेक भागात छापे टाकले आणि ५०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी बहुतेक बांगलादेशी नागरिक आहेत. (Bangladeshi Infiltrator)

हेही वाचा-बहुमताने मंजूर केला Waqf Amendment Act सर्वोच्च न्यायालय रोखू शकत नाही ; केंद्र सरकारने दाखल केले प्रतिज्ञापत्र

अहमदाबादमध्ये सुमारे ४५४ आणि सुरतमध्ये १०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. सध्या या सर्वांची चौकशी सुरू आहे आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. काही लोकांकडे भारतीय आधार कार्डही सापडले आहेत. पोलिसांनी सर्वांचे फोनही जप्त केले आहेत. (Bangladeshi Infiltrator)

हेही वाचा- Amit Shah यांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन ; दिले महत्त्वाचे निर्देश

गुजरात पोलिसांची घुसखोरांना पकडण्यासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. पोलिसांची ही कारवाई शनिवारी मध्यरात्री १२ वाजता सुरू झाली आणि सकाळी ६ वाजेपर्यंत चालली. घुसखोरांना ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी सर्वांना पायी पोलिस मुख्यालयात नेले. (Bangladeshi Infiltrator)

गृहमंत्र्यांच्या सूचनांनुसार गुजरात सरकारची कारवाई
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सर्व राज्य सरकारांना परदेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांना परत पाठवण्याचे निर्देश दिले. यानंतर, गुजरात सरकारने पोलिसांना राज्यातील मोठ्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांना तात्काळ ताब्यात घेण्यास सांगितले, आणि कारवाई करण्यात आली. (Bangladeshi Infiltrator)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.