Indus Waters Treaty थांबवल्याने भारताला काय होणार फायदा?

या कराराने (Indus Waters Treaty) पश्चिमेकडील नद्यांचे पाणी - सिंधू, झेलम आणि चिनाब - पाकिस्तानला आणि पूर्वेकडील नद्यांचे पाणी - रावी, बियास आणि सतलज - भारताला दिले जाते.

134

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची उच्च पातळीवर सुरक्षा बैठक झाल्यावर पाकिस्तानच्या विरोधात कठोर भूमिका घेताना ६ धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी सिंधू नदी पाणी करार (Indus Waters Treaty) थांबवण्याच्या निर्णयाचा मोठा फटका  पाकिस्तनाला बसणार आहे. कारण सिंधू नदी करारामुळे (Indus Waters Treaty) नदीच्या एकूण पाण्यापैकी ८० टक्के पाणी पाकिस्तानला दिले जाते, याचा अर्थ पाकिस्तानला सिंचन आणि इतर कामांसाठी जास्त पाणी उपलब्ध आहे. भारताला उर्वरित २० टक्के पाणी उपलब्ध आहे, ज्यामुळे भारताला सिंचन आणि इतर कामांसाठी मर्यादित पाणी उपलब्ध आहे. आता हा करार थांबवल्याने पाकिस्तानमध्ये पाणीबाणी परिस्थिती निर्माण होणार आहे. पण भारताला लाभ होणार आहे.

(हेही वाचा Pahalgam Terror Attack : अतिरेकी हल्ल्यामुळे विमान कंपन्यांनी कॅन्सलेशन-रिशेड्यूलिंग शुल्क केले माफ)

वीज निर्मिती प्रकल्प सक्षमपणे सुरू होणार 

या कराराने (Indus Waters Treaty) पश्चिमेकडील नद्यांचे पाणी – सिंधू, झेलम आणि चिनाब – पाकिस्तानला आणि पूर्वेकडील नद्यांचे पाणी – रावी, बियास आणि सतलज – भारताला दिले जाते. या करारात धरणे, लिंक कालवे, बॅरेज आणि ट्यूबवेल विशेषतः सिंधू नदीवरील तारबेला धरण आणि झेलम नदीवरील मंगला धरण यांच्या निधी आणि बांधकामाची तरतूद होती. यामुळे पाकिस्तानला पूर्वी भारताच्या विशेष वापरासाठी नियुक्त केलेल्या नद्यांमधून मिळणाऱ्या प्रमाणात पाणी पुरवण्यास मदत झाली होती.  पण आता हा करार (Indus Waters Treaty) थांबवल्याने पाकिस्तानला ज्या नदीचे पाणी दिले जाते त्या चिनाब नदीचे पाणी भारताला मुबलक प्रमाणात मिळणार आहे. विशेष म्हणजे भारताने आधीच २०१५ मध्ये या नदीवर बघलीयर नावाने हायड्रोइलेकट्रीक वीज प्रकल्प भारताने उभारला आहे. मात्र आता या निर्णयामुळे हा प्रकल्प अधिक क्षमतेने कार्यरत करता येणार आहे. म्हणजे या धरणासाठी या नदीचे पाणी अडवता येईल, जेणेकरून हा वीज निर्मिती प्रकल्प अधिक सक्षमपणे चालवता येणार आहे. एकूण ९०० मेगावॅट वीज निर्मिती करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. (Indus Waters Treaty)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.