अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर (China) २४५ कर लावल्यामुळे चीनची अर्थव्यवस्था ढासळली आहे. चीनची गोदामे भरलेलीच आहेत, ती रिकामे व्हायला तयार नाहीत. अमेरिकेन व्यापाऱ्यांनी त्यांच्या ऑर्डर रद्द केल्या आहेत. याचा परिणाम म्हणून चीनचे कारखाने बंद पडली आहेत. बेकारी वाढलेली आहे. शेअर बाजार कोसळला आहे. अशा प्रकारे चीनमध्ये अमेरिकेच्या निर्णयामुळे हाहाकार माजला आहे. भारताचा क्रमांक एकचा शत्रू असलेल्या चीनची अमेरिकेने मुस्कटदाबी केली आहे, असे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने अशी भूमिका हिंदुस्थान पोस्टच्या युट्युब चॅनलवर बोलताना मांडली.
भारताचा खरा शत्रू चीन (China) आहे. कारण चीन हा पाकिस्तानचा मायबाप आहे. चीनला जर मारायचे असेल तर अमेरिकेची भूमिका महत्वाची आहे. कारण चीन अमेरिकेचाही मोठा शत्रू आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये सध्या करयुद्ध सुरु आहे. १ फेब्रुवारी २०२५ रोजी ट्रम्प यांनी चीनवर १० टक्के अतिरिक्त कर लावला. ४ मार्चला त्यात अजून १० टक्के वाढ केली. १० मार्चला चीनने (China) त्याविरोधात अमेरिकेवर १५ टक्के कर लावला. त्यानंतर २ एप्रिलला ट्रम्प यांनी ५४ टक्के कर लावला. पुढे ट्रम्प यांनी १४५ टक्के कर वाढवला. मग चीनने १२५ टक्के कर वाढवला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर २४५ टक्के कर लावला. म्हणजे १०० डॉलरची वस्तू चीन विकत असेल, तर ती चीनला ३४५ डॉलरने विकावी लागणार आहे. थोडक्यात म्हणजे चीनची ती वस्तू महागल्याने कुणी घेणार नाही. चीनच्या उत्पादनांनी गोदामे भरलेली आहेत. ती रिकामी होत नाहीत, त्यामुळे चीनमधील कारखाने बंद पडू लागली आहेत, असे चंद्रशेखर नेने म्हणाले.
(हेही वाचा Pahalgam Terrorist Attack वरून रॉबर्ट वाड्रा यांनी ओकली गरळ; म्हणाले, मुसलमान नाराज झाले आहेत, म्हणून…)
अमेरिकेसोबतचे टेरिफ वॉरने चीन घायाळ
गोल्डमन सॅक ही सर्वात मोठी आर्थिक विषयावर संशोधन करणारी कंपनी आहे, ट्रेडिंग फर्म आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या कर वाढीमुळे चीनमधील २० लाख कामगार बेकार होऊ लागले आहेत. जर असेच टेरिफ वॉर सुरु राहिले, तर चीनची (China) गोदामे भरलेलीच राहतील. कारण अमेरिकेच्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या ऑर्डर रद्द केल्या आहेत. परिणामी चीनमधील कारखाने बंद पडू लागली आहेत. अशा प्रकारे चीनमध्ये हाहाकार माजला आहे. तेथील स्टॉक मार्केट कोसळला आहे. म्हणून चीन त्याला पर्याय म्हणून इतर मित्र राष्ट्रांकडे जाऊन व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करू लागला आहे. ज्या देशांवर आधी चीनने कुरघोड्या केल्या होत्या, त्यांना तो अमेरिकेशी संयुक्तपणे लढा देऊ असे म्हणू लागला आहे. पण हा लढा कोण देणार? जसा चीन अमेरिकेला माल निर्यात करतो तसा व्हिएतनामही निर्यात करतो. कारण व्हिएतनामची ८० टक्के निर्यात फक्त अमेरिकेत होते. अमेरिकेने जर डोळे वटारले तर व्हिएतनाम देश बंद पडेल, अशी तेथील परिस्थिती आहे. त्यामुळे शी जिंगपिंग व्हिएतनाममधून बाहेर पडल्यानंतर लगेचच व्हिएतनामने अमेरिकेला संपर्क करून त्यांच्यामधील संबंध कायम असल्याचा विश्वास व्यक्त केला, असेही चंद्रशेखर नेने म्हणाले.
शी जिंगपिंगच्या विरोधात चीनमध्ये असंतोष
चीनला (China) निवडून त्याच्यावर सगळा मारा अमेरिकेने सुरु केला आहे. युरोपियन युनियननेही अमेरिकेच्या निर्णयावर सुरुवातीला दादागिरी केली होती, पण त्यांनीही नमते घेतले. म्हणजे चीन जो अमेरिकेच्या विरोधात संघ उभा करत होता, त्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे तेथील लोक शी जिंगपिंग यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. चीनचे ८०० अब्ज डॉलरचे स्टॉक शेअर मार्केटमध्ये आहेत, उद्या जर अमेरिकेने या स्टॉकला काहीही किंमत नाही असे सांगितले तर त्यांची किंमत शून्य होईल, याचीही भीती चीनला वाटू लागली आहे. अमेरिकेच्या या खेळीमुळे चीनचे (China) धाबे दणाणले आहेत, असेही शी जिंगपिंग म्हणाले.
Join Our WhatsApp Community