Pahalgam Terrorist Attack वरून रॉबर्ट वाड्रा यांनी ओकली गरळ; म्हणाले, मुसलमान नाराज झाले आहेत, म्हणून…

आपल्या देशात आपण पाहतो की हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलत आहे आणि अल्पसंख्याकांना अस्वस्थ आणि त्रासदायक वाटते. देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट निर्माण झाली, म्हणूनच पहलगाम येथे हल्ला झाला आहे, असे रॉबर्ट वाड्रा म्हणाले.

165

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) देशभरातून संताप व्यक्त होऊ लागला आहे. या हल्ल्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर द्यावे, अशी भावना सर्वसामान्य व्यक्त करत आहेत. राजकीय पातळीवरही या हल्ल्याचा सर्व पक्षांनी निषेध केला असताना सोनिया गांधींचे जावई आणि प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी मात्र गरळ ओकली आहे. त्यामुळे आता वाड्रा यांच्या प्रतिक्रियेनंतर त्यांच्या प्रति संताप व्यक्त होऊ लागला आहे.

रॉबर्ट वाड्रा काय म्हणाले? 

मला असे वाटले की, मुस्लिमांना मशिदींमध्ये नमाज अदा करण्यापासून रोखले जात आहे किंवा कोणत्याही मूर्ती शोधण्यासाठी मशिदींचे सर्वेक्षण केले जात आहे, जे संभलमध्ये घडत आहे. जर तुम्ही बाबर किंवा औरंगजेबबद्दल बोललात तर अल्पसंख्याकांना वाईट वाटते. यावरून राजकारण होते आणि त्यावर बंदी घातली जाते. धर्म आणि राजकारण वेगळे असले पाहिजे. जर हे थांबवले नाही तर हे दहशतवादी हल्ले (Pahalgam Terrorist Attack) होतच राहतील. कारण आयडी पाहून त्याने गोळीबार केल्याचे पुरावे आहेत. त्यांना मारायचे की सोडून द्यायचे हे कुठून येते? त्यांचा विचार असा आहे की मुस्लिमांना दडपले जात आहे, असेही रॉबर्ट वाड्रा म्हणाले.

(हेही वाचा Pahalgam Terror Attack : अमेरिका, रशिया, इस्रायल, इराणसारख्या देशांनी केला निषेध)

मला खूप वाईट वाटते आणि या दहशतवादी कृत्यात मारल्या गेलेल्या लोकांबद्दल माझी तीव्र संवेदना आहे. आपल्या देशात आपण पाहतो की हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलत आहे आणि अल्पसंख्याकांना अस्वस्थ आणि त्रासदायक वाटते. देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट निर्माण झाली, म्हणूनच हे घडले. जर तुम्ही या दहशतवादी कृत्याचे विश्लेषण केले तर, जर ते (दहशतवादी) लोकांची ओळख पाहत असतील तर ते असे का करत आहेत? कारण आपल्या देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एक फूट निर्माण झाली आहे. यामुळे अशा संघटनांना असे वाटेल की हिंदू सर्व मुस्लिमांसाठी समस्या निर्माण करत आहेत. ओळख पाहून आणि नंतर एखाद्याला मारून टाकणे, हा पंतप्रधानांना संदेश आहे, कारण मुस्लिमांना कमकुवत वाटत आहे. अल्पसंख्याकांना कमकुवत वाटत आहे. आपल्या देशात आपल्याला सुरक्षित आणि धर्मनिरपेक्ष वाटेल आणि अशा कृत्ये घडताना दिसणार नाहीत, अशी सूचना वरून आली पाहिजे, असेही रॉबर्ट वाड्रा म्हणाले. (Pahalgam Terrorist Attack)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.