Pahalgam Terrorist Attack : काश्मीरच्या पर्यटनावर बहिष्कार घाला; उत्तरप्रदेशच्या आमदाराचे आवाहन

Pahalgam Terrorist Attack : काश्मीरमधील जवळजवळ प्रत्येकाचीच फुटीरतावादी मानसिकता आहे, यात शंका नाही; काही उघडपणे, तर काही अप्रत्यक्षपणे, दहशतवादाचे समर्थन करतात.

109
Pahalgam Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीर दहशतवादी हल्ला; राज्यातील ६ जणांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २८ पर्यटकांची हत्या केली. लोकांना गोळ्या घालून निर्घृणपणे मारण्यात आले. त्यात दोन परदेशी, दोन स्थानिक आणि इतर पर्यटकांचा समावेश आहे. (Pahalgam Terrorist Attack) या हल्ल्यानंतर देशभरात आणि जगभरात दहशतवादाविरुद्ध रोष दिसून येत आहे. या हल्ल्यात कानपूर येथील तरुण व्यापारी शुभमला आपला जीव गमवावा लागला आहे. शुभमचे लग्न या वर्षी १२ फेब्रुवारी रोजी झाले. शुभमच्या पत्नीने कुटुंबाला सांगितले की, पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या. या हल्ल्यानंतर संताप व्यक्त करताना, जनसत्ता दल (डेमोक्रॅटिक) चे प्रमुख आणि उत्तर प्रदेशातील कुंडा मतदारसंघाचे आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ ​​राजा भैया यांनी लोकांना काश्मीरमधील पर्यटनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack घडविणाऱ्या ‘त्या’ क्रूरकर्मांचा फोटो आला समोर !)

राजा भैय्या यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, काश्मीरमधील हिंदूंना खूप पूर्वी मारण्यात आले होते. (kashmir tourism) ज्यांनी आपले प्राण वाचवले आणि पळून जाण्यात यश मिळवले ते अजूनही त्यांच्याच देशात निर्वासित आहेत. (Kashmiri Hindus) आता, मी पर्यटक बंधू आणि भगिनींना सांगू इच्छितो, जेव्हा आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या मुलांना काश्मीरला घेऊन जातो. तेव्हा आपण केवळ आपल्या कुटुंबांचे जीव धोक्यात घालत नाही, तर दहशतवादी, फुटीरतावादी आणि जिहादी शक्तींना आर्थिकदृष्ट्या बळकटी देतो. दाल सरोवर येथे बोटींवर आपल्या कुटुंबियांसोबत सेल्फी काढून आपण जगाला संदेश देतो की, काश्मीर शांत आहे. पुन्हा एकदा सत्य बाहेर आले आहे. काश्मीरमधील जवळजवळ प्रत्येकाचीच फुटीरतावादी मानसिकता आहे, यात शंका नाही; काही उघडपणे, तर काही अप्रत्यक्षपणे, दहशतवादाचे समर्थन करतात. तिथले राजकीय पक्षही याला अपवाद नाहीत. काश्मीरमध्ये जाऊन हॉटेल्स, जेवण आणि खरेदीवर खर्च करून आपण त्यांचा तथाकथित जिहाद बळकट करत आहोत.

आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले दहशतवादी पहलगामपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन येथे पोहोचले. हा खूप उंचावर वसलेला एक मोठा गवताळ प्रदेश आहे, ज्याला ‘मिनी स्वित्झर्लंड’ असेही म्हणतात. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार सुरू केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.