Pahalgam Terrorist Attack मध्ये मृत पावलेल्यांना गृहमंत्री अमित शाहांनी वाहिली श्रध्दांजली !

Pahalgam Terrorist Attack मध्ये मृत पावलेल्यांना गृहमंत्री अमित शाहांनी वाहिली श्रध्दांजली !

77
Pahalgam Terrorist Attack मध्ये मृत पावलेल्यांना गृहमंत्री अमित शाहांनी वाहिली श्रध्दांजली !
Pahalgam Terrorist Attack मध्ये मृत पावलेल्यांना गृहमंत्री अमित शाहांनी वाहिली श्रध्दांजली !

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terrorist Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी २.४५ वाजता बैसारन व्हॅली परिसरात ही घटना घडली. दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील शुभम द्विवेदीचे नाव विचारले आणि नंतर त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर त्यांनी इतर लोकांवर गोळीबार केला आणि तेथून पळून गेले. लष्कर-ए-तैयबाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. (Pahalgam Terrorist Attack)

अमित शाहांनी वाहिली श्रद्धांजली
बुधवारी सकाळी गृहमंत्री अमित शाह, एलजी सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला श्रीनगरला पोहोचले. येथे शहा यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना अमित शाहांनी श्रद्धांजली वाहिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह पहलगामला रवाना झाले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सातत्याने शोध मोहीम सुरू आहे. पर्यटकांवर गोळीबार करून पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. (Pahalgam Terrorist Attack)

पर्यटक सुरक्षित परतीसाठी मुख्यमंत्र्यांचे आवाहन
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन भागातील जम्मू-काश्मीरच्या सहलीला गेलेले ६७ पर्यटक पुलगावमध्ये अडकले आहेत. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. पर्यटकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित परतीसाठी आवाहन केले आहे. (Pahalgam Terrorist Attack)

उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, २ दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ बुधवारी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यानंतर भारतीय सैन्याने गोळीबार सुरू केला. ही चकमक अजूनही सुरू आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांना २-३ दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करताना दिसले. या भागात शोध मोहीमही सुरू आहे. (Pahalgam Terrorist Attack)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.