Pahalgam Terrorist Attack : पंतप्रधान मोदी दिल्लीत ! दहशतवाद्यांवर कारवाईची तयारी सुरू ; विमानतळावरच अधिकाऱ्यांसोबत बैठक

Pahalgam Terrorist Attack : पंतप्रधान मोदी दिल्लीत ! दहशतवाद्यांवर कारवाईची तयारी सुरू ; विमानतळावरच अधिकाऱ्यांसोबत बैठक

159

जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terrorist Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. पहलगाम येथे झालेल्या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट थांबवला. पंतप्रधान बुधवारी सकाळी दिल्लीला परतले. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर हा हल्ला खोऱ्यातील सर्वात मोठा आणि प्राणघातक दहशतवादी हल्ला असल्याचे मानले जात आहे. या हल्ल्याविरोधात संपूर्ण देशात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. (Pahalgam Terrorist Attack)

हा मुद्दा विशेषतः पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात उपस्थित करण्यात आला. दोन्ही नेत्यांनी दहशतवादाचा निषेध केला आणि धोरणात्मक भागीदारी परिषदेचे सह-अध्यक्ष म्हणून द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्यावर भर दिला. मोहम्मद बिन सलमान यांनी हा हल्ला “अमानवीय आणि निंदनीय” असल्याचे वर्णन केले आणि भारतासोबत एकता व्यक्त केली. (Pahalgam Terrorist Attack)

काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाहून परतल्यानंतर परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सुरक्षा संस्थांकडून अहवाल मागवण्यात आले आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) यांच्या संपर्कात राहून प्रत्येक क्षणाची माहिती मिळवण्यात आली. (Pahalgam Terrorist Attack)

श्रीनगरमध्येही उच्चस्तरीय बैठक
दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगरमध्ये एक उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ही बैठक सुरक्षा संस्थांच्या प्रमुखांसोबत आणि जम्मू आणि काश्मीर प्रशासनासोबत झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या श्रीनगरमध्ये आहेत. ते आज पहलगामला जाऊ शकतात. (Pahalgam Terrorist Attack)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.