Patta Fort : जिथे साक्षात शिवरायांनी विश्रांती घेतली, तो पट्टा किल्ला पाहायचाय? चला करुया पट्टा किल्ल्याची सफर 

39
Patta Fort : जिथे साक्षात शिवरायांनी विश्रांती घेतली, तो पट्टा किल्ला पाहायचाय? चला करुया पट्टा किल्ल्याची सफर 
पट्टा किल्ल्याचा आढावा : 

पट्टा किल्ल्याला विश्रामगड म्हणूनही ओळखलं जातं. एके काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या पट्टा किल्ल्यावर आपल्या सैन्यासोबत विश्रांती घेतली होती. त्यानंतर हा किल्ला प्रसिद्ध झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं नाव विश्रामगड असं ठेवलं. (Patta Fort)

विश्रामगड हा किल्ला कळसूबाई शिखराच्या पूर्वेला औंध, बितनगड सारख्या इतर किल्ल्यांसोबत वसलेला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी पट्टेवाडी नावाचं ३०-३५ घरं असलेलं एक छोटेसं गाव आहे. पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पट्टेवाडी या गावात एक ऐतिहासिक तोफखाना आहे. (Patta Fort)

याव्यतिरिक्त विश्रामगड किल्ल्यावर अंबरखाना, शस्त्रे आणि इतर युद्धसामग्री साठवण्याचे ठिकाण असलेला दारुखाना, किल्ल्याच्या उत्तरेला बुरुज आणि दक्षिणेला तटबंदी, पट्टेदेवीचं मंदिर, त्र्यंबक दरवाजा अशी अनेक आकर्षणे आहेत. तसंच पट्टेवाडी गावाच्या वाटेवर अनेक पवनचक्क्या आहेत. (Patta Fort)

पट्टा किल्ला हा चढायला सोपा आहे. या किल्ल्याजवळ एक राजवाडा आहे. पण गेल्या काही वर्षांत तो मोडकळीस आला आहे. पट्टा किल्ल्यावर पट्टावाडी गावाजवळच्या गुहांमध्ये श्री लक्ष्मणगिरी महाराजांचं मंदिर आहे. पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मणगिरी महाराजांचे शिष्य या गुहांमध्ये जमतात. इथल्या वन विभागाने गावकऱ्यांच्या मदतीने किल्ल्यावर जाणारा मार्ग, पायऱ्या इत्यादी विकसित केले आहेत. (Patta Fort)

(हेही वाचा – लोकशाहीत संसदच सर्वोच्च; उपराष्ट्रपतींच्या भाषणात Supreme Court च्या विरोधी विधानांचा उल्लेख)

पट्टा/विश्रामगड किल्ल्याची माहिती : 
  • ट्रेक ग्रेड – सोपा
  • किल्ल्याचा प्रकार – डोंगरी किल्ला
  • पट्टा किल्ला/विश्रामगडाची उंची – ४५६२ फूट
  • पट्टा किल्ला स्थित असलेला प्रदेश – नाशिक
  • पट्टा किल्ला/विश्रामगड किल्ल्याच्या पायथ्याचं गाव – पट्टावाडी
  • पट्टा किल्ला विश्रामगड असलेल्या डोंगररांगा – पट्ट्या रांगा (Patta Fort)

(हेही वाचा – राज्यातील Fishermen झाले शेतकरी!)

पट्टा किल्ल्यावर ट्रेकिंगला जाताना सोबत आणायच्या वस्तू : 
  • २/३ लिटर पाणी
  • चांगला टॉर्च आणि अतिरिक्त बॅटरी असणं गरजेचं आहे.
  • ट्रेकिंग शूज वापरल्यास ट्रेक जास्त सोपा आणि आरामदायी होतो.
  • हिवाळी जॅकेट/स्वेटर
  • एक दिवसाचा बॅकपॅक २० ते ३० लिटर
  • काही ड्रायफ्रुट्स/ड्राय स्नॅक्स/एनर्जी बार
  • ग्लुकॉन डी/ओआरएस/टँग/गेटोरेड सॅशे
  • सन कॅप आणि सनस्क्रीन
  • वैयक्तिक प्रथमोपचार पेटी आणि वैयक्तिक औषध
  • ओळख पुरावा

टीप :- कृपया पूर्ण बाह्या असलेले टीशर्ट आणि पूर्ण ट्रॅक पँट घाला जे उन्हाळ्यातल्या उन्हापासून, काटेरी कीटक, काटेरी झुडुपांपासून तुमचं संरक्षण करतील. (Patta Fort)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.