फुकट्या प्रवाशांकडून Central Railway ने वर्षभरात वसूल केली ‘इतकी’ मोठी रक्कम  

73
फुकट्या प्रवाशांकडून Central Railway ने वर्षभरात वसूल केली 'इतकी' मोठी रक्कम  
फुकट्या प्रवाशांकडून Central Railway ने वर्षभरात वसूल केली 'इतकी' मोठी रक्कम  

Central Railway : मध्य रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षामध्ये १७ लाख ३७ हजार फुकट्या प्रवाशांना (Without Ticket Passenger) पकडले असून, त्यांच्याकडून ७४ कोटी १४ लाखांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे यातील मेल-एक्स्प्रेस आणि उपनगरीय मार्गावर अव्वल ठरलेल्या तिकीट तपासनींसांनी (TC) वसूल केलेल्या दंडाची रक्कम एक कोटीच्या घरात आहे. (Central Railway)

(हेही वाचा – JD Vance India Visit : अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा सहकुटुंब भारत दौरा; मंदिरात दर्शन, पंतप्रधानांनी मुलांना दिली ‘ही’ भेट)

मेल-एक्स्प्रेस (Mail-Express) मार्गावर सर्वाधिक महसूल मोहमद शाम यांनी जमा केला असून, त्यांनी १० हजार १११ प्रकरणांमधून ७६ लाख ७ हजार रुपयांचा महसूल मिळवला आहे. तर, त्याच मार्गावर दुसऱ्या क्रमांकावर ९ हजार तीनशे प्रकरणांत ७२ लाख ९५ हजार एवढा दंड वसूल करणारे एस. नैनानी यांची नोंद झाली आहे. उपनगरीय मार्गावर एच. सी. तेंडुलकर यांनी ६ हजार ६५८ प्रवाशांकडून ३२ लाख ९३ हजार २२० रुपयांचा दंड वसूल केला असून, महिला टीसीमध्ये सुधा द्विवेदी यांनी सर्वाधिक ११ हजार ३२१ विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडून ३२ लाख १६ हजारांचा दंड वसूल करण्याची कामगिरी केली आहे.

(हेही वाचा – Tarabai Maharani Samadhi : महाराणी ताराराणींच्या समाधीस्थळाचा होणार जीर्णोद्धार)

१२०० टीसींकडून कारवाई 

सुमारे १२०० पेक्षा अधिक तिकीट तपासनीसांच्या माध्यमातून मध्य रेल्वेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. यामध्ये १७५ पेक्षा जास्त महिला टीसींचा समावेश आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये दंडाच्या रकमेत वाढ प्रस्ताव बोर्डाकडे पाठविला आहे. यापूर्वी दंडाची रक्कम २००४ मध्ये वाढविलेली असल्याने २० वर्षांनंतर पुन्हा त्यामध्ये वाढ करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे. फुकट्यांना रोखण्यासाठी ती रक्कम वाढवणे गरजेचे असल्याचे रेल्वे (Railway) अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  या १७ लाख ३७,७८२ एकूण फुकट्या प्रवाशांकडून ७४ कोटी १३ लाख ९१,८५८ वसूल करण्यात आले आहे.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.