बाबा सिद्दिकींप्रमाणेच तुला…; माजी आमदार Zeeshan Siddique यांना ठार मारण्याची धमकी

Zeeshan Siddique death threat : २०२४ मध्ये बाबा सिद्दिकी यांची वांद्रे या ठिकाणी काही हल्लेखोरांनी हत्या केली.

81

बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येचा विषय ताजा असतांनाच त्यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीचा ई मेल त्यांना आला आहे. २०२४ मध्ये बाबा सिद्दिकी यांची वांद्रे या ठिकाणी काही हल्लेखोरांनी हत्या केली. ‘बाबा सिद्दिकींप्रमाणेच तुझी अवस्था करु’, असे या मेलमध्ये लिहिले आहे.

(हेही वाचा – Uddhav Thackeray हे आधुनिक दुर्योधन; खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका)

गेल्या दोन दिवसांपासून झिशान सिद्दिकींना धमकीचे मेल येत आहेत. या मेलमधून सिद्दिकी यांच्याकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. प्रत्येकी सहा तासांनंतर आठवण करुन देण्यासाठी मेल पाठवणार असल्याचा उल्लेख आहे. धमकीनंतर पोलीस सिद्दिकी यांच्या घरी दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे. डी कंपनीच्या नावाने ही धमकी देण्यात आली असल्याची माहिती आहे. झिशान सिद्दिकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईतील खेरवाडी येथील त्यांच्या कार्यालयासमोरच शनिवार, १२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री मारेकऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार करत हत्या केली होती. त्यांना जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयात ते जात होते. तेव्हा खेरवाडी सिग्नलजवळ बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन मारेकऱ्यांनी अत्यंत जवळून गोळीबार करीत त्यांची हत्या केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.