Konkan Railway: कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार, ‘हे’ आहे कारण…

84
Konkan Railway: कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार, 'हे' आहे कारण...
Konkan Railway: कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार, 'हे' आहे कारण...

Konkan Railway : उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वेच्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशातच कोकणातील (Konkan) चाकरमान्यांसह मोठ्या प्रमणात पर्यटकांची गर्दी कोकणात वाढते. दरम्यान मध्य रेल्वेवरील (Central Railway) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्ताराचे काम (Railway Platform Extension) सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहेत. (Konkan Railway)

(हेही वाचा – समय रैनाच्या अडचणी पुन्हा वाढल्या; अपंगत्वावर केलेल्या टिप्पणीमुळे Supreme Court संतापले; म्हणाले…)

मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत जाईल. जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस गाडीही सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत धावणार आहे. तिन्ही गाड्यांचे अशा प्रकारचे वेळापत्रक ३० एप्रिलपर्यंत असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाच्या कामांनी वेग धरला आहे. त्यामुळे या फलाटावर येणाऱ्या रेल्वेगाड्या इतर फलाटावर पाठवण्यात येतात. काही रेल्वेगाड्या फलाटाच्या अभावामुळे त्यांचा सीएसएमटी थांबा रद्द केला आहे. यामध्ये कोकणातील तीन रेल्वेगाड्या आहेत.

(हेही वाचा – BMC : नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक)

काम पूर्ण झाल्यानंतर या फलाटावरून २४ डब्यांची रेल्वेगाडी धावू शकेल. परंतु सध्या सुरू असलेल्या पायाभूत कामांमुळे गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (Mangaluru to Mumbai CSMT Express) ठाण्यापर्यंत धावेल. गाडी क्रमांक २२१२० मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२०५२ मडगाव ते सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवून अंशत: रद्द केली जाईल. अशा पद्धतीचे वेळापत्रक ३० एप्रिलपर्यंत चालवण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.