लडाखच्या दुर्गम आणि उंच भागात मोबाईल कनेक्टिव्हिटी प्रदान करून भारतीय सैन्याने (Indian army) इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच, पूर्व लडाख, पश्चिम लडाख आणि जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरसारख्या दुर्गम भागात तैनात असलेल्या सैनिकांना आणि तिथे राहणाऱ्या लोकांना जलद 4G आणि 5G मोबाइल नेटवर्कची सुविधा मिळाली आहे. (Indian army)
In a transformative stride towards bridging the digital divide and empowering remote communities, the Indian Army has facilitated unprecedented mobile connectivity across the remote and high-altitude areas of Ladakh, including forward locations in Eastern Ladakh, Western Ladakh,… pic.twitter.com/bxWqYDNFn8
— ANI (@ANI) April 19, 2025
भारतीय सेनेच्या या निर्णयामुळे सैनिकांना आता आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधता येणार आहे. तसेच सैनिकांसोबतच दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांनाही या मोबाईल कनेक्टिव्हीटीचा फायदा होणार आहे. या भागात भारतीय सेना आणि टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या (TSPs) मदतीने मोबाईल कनेक्टिव्हीटी पोहोचू शकलेली आहे. या मोहिमेअंतर्गत लडाख आणि कश्मीरच्या सीमाक्षेत्रांत अनेक ठिकाणी मोबाईल टॉवर्सची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे सैनिक त्यांच्या कुटुंबीयांशी जोडले जाणार आहेत. तसेच तेथे सीमाभागात राहणाऱ्या गावकऱ्यांचा सामाजिक, आर्थिक विकास होण्यासही या मोहिमेचा उपयोग होणार आहे. (Indian army)
या भागात कुठेही मोबाईल नेटवर्क नव्हते. काही सैनिक तर 18,000 फूट उंचीवर तैनात असतात त्यामुळे त्यांचा संपर्क जवळजवळ सर्वांपासूनच तुटतो. आता याच भागात 4G आणि 5G नेटवर्क उपलब्ध करून देण्यात आलंय. त्यामुळे सैनिकांच्या कर्तव्यात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. तसेच सैनिकांना त्यांच्या कुटंबीयांशीही सतत संपर्क साधता येणार आहे. यामुळे सैनिकांना मानसिक तणावातून मुक्तता मिळण्यास मदत होणार आहे. (Indian army)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community