Chandrapur : विदर्भात गेल्या 4 दिवसांपासून सातत्याने तापमानात (temperature) वाढ होत आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे रविवारी कमाल 44.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे चंद्रपूर हे राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. तर नागपूरमध्ये 44. अंश सेल्सियस हे तापमान नोंदवण्यात आले आहे. (Chandrapur)
(हेही वाचा – वक्फ कायद्यावर संपूर्ण देश शांत, पण केवळ West Bengal का पेटले?)
विदर्भात सकाळी 8 वाजेपासून उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात होते. तर दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हामुळे रस्त्यावर शुकशुकाट पसरतो. विदर्भात सर्वदूर पारा 40 अंशांच्या पुढे गेला असून ब्रम्हपुरी व अमरावती येथे 44.4, वर्धा 44, अकोला 44.3, यवतमाळ 44.6, गडचिरोली 42.6, गोंदिया 42.2, वाशिम 42.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
(हेही वाचा – कर्नाटकचे माजी डीजीपी Om Prakash यांची निर्घृण हत्या; नेमकं प्रकरण काय ?)
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्हा (Buldhana district) थंड राहिला आहे. तिथे 39.6 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. येणाऱ्या दिवसात पारा सतत चढता राहाणार असून विदर्भात उष्णतेची लाट राहिल, असा इशारा प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community