IPL 2025 : क्रिकेटचे असे नियम जे फक्त आयपीएलमध्येच आहेत!

IPL 2025 : मैदानात खेळाडूंची बॅट तपासण्यावरून सध्या गोंधळ सुरू आहे.

72
IPL 2025 : क्रिकेटचे असे नियम जे फक्त आयपीएलमध्येच आहेत!
  • ऋजुता लुकतुके

मैदानावर खेळाडूंची बॅट तपासणं असो किंवा मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद मधील सामन्यात तिसऱ्या पंचांनी क्लासेनकडून झालेल्या चुकीची दखल घेऊन रायन रिकलटनला परत बोलावणं असो, असे काही नियम आहेत जे आयसीसीच्या आधी आयपीएल लीगने लागू केले आहेत. तसंच काही नियम फक्त आयपीएलमध्येच अस्तित्वात आहेत. क्रिकेटमध्ये सगळ्यांना विजयाची समान संधी असावी आणि त्याचबरोबर क्रिकेटचा खेळ रंगतदार व्हावा यासाठी आयपीएलने ही पावलं उचलली आहेत. असेच फक्त आयपीएलमध्ये असलेले नियम पाहूया, (IPL 2025)

षटकांची गती न राखल्यास कर्णधाराला मिळतो डिमेरिट गुण व दंड : आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्येही षटकांची गती न राखणाऱ्या संघांविरोधात आयसीसी कडक भूमिका घेते. कारण, क्रिकेटचे सामने रटाळ न होता ते वेळेत पूर्ण व्हावेत याकडे आयसीसीचा कल आहे. पण, एखाद्या संघाने षटकांची गती राखली नाही तर आयसीसी विशेष कारवाई करत नाही. फक्त कर्णधारांच्या सामन्यातील मानधन कापण्यात येतं. पण, आयपीएलमध्ये एका सामन्यात षटकांची गती राखली नाही तर कर्णधारांना डिमेरिट गुण मिळतो. दोन सामन्यांत असं झालं तर कर्णधाराला पुढील सामना खेळता येत नाही. (IPL 2025)

(हेही वाचा – उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर मंत्री Nitesh Rane यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, स्वत:च्या अस्तित्वासाठी…)

स्ट्रॅटेजिक टाईम-आऊट : स्ट्रॅटेजिक टाईम आऊट हा खास आयपीएलसाठी असलेला नियम आहे. या कालावधीत संघाचे खेळाडू एकत्र येऊन मैदानात चर्चा करू शकतात. त्यांना जलपानाचा वेळ मिळतो आणि या कालावधीत टीव्ही प्रसारणात जाहिराती दाखवण्यासाठी वेळ मिळतो. बीसीसीआयने जाहिरातदारांसाठी जुळवून आलेला हा ब्रेक आहे. दोन्ही डावांमध्ये १३ ते १६ व्या षटकांच्या दरम्यान संघांना स्ट्रटेजिक ब्रेक घेता येतो. (IPL 2025)

चेंडूला थुंकी, लाळ लावण्याची परवानगी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांची ही मागणी पहिल्यापासून आहे. कोरोनाच्या काळात चेंडूवर थुंकी किंवा लाळ लावायला बंदी घालण्यात आली होती. पण, गोलंदाजांना त्यानंतर पुन्हा ही परवानगी हवी होती. चेंडूची चकाकी आणि त्यामुळे स्विंग टिकवण्यासाठी गोलंदाजांना याचा उपयोग होतो. आयसीसीने अजून तशी परवानगी दिलेली नाही. पण, आयपीएलने गोलंदाजांच्या मागणीची कदर करत तशी परवानगी दिली आहे. यामुळे चेंडूचा स्विंग टिकून फलंदाज विरुद्ध गोलंदाज असं द्वंद्व रंगण्याची शक्यता वाढते. (IPL 2025)

(हेही वाचा – Affordable Homes : देशातील आठ शहरांमध्ये कसे आहेत घरांचे भाव? कुठे भाव वाढतायत, कुठे होतायत कमी?)

इम्पॅक्ट खेळाडू : इम्पॅक्ट सब ही यंदाच्या हंगामात आयपीएलने सुरू केलेला मोठा नियम आहे. यामुळे दोन्ही संघांना अंतिम अकरा खेळाडूंची निवड केल्यानंतरही सामना सुरू झाल्यावर कुठल्याही क्षणी एक खेळाडू बदलून त्याच्या जागी दुसरा खेळाडू आणण्याची परवानगी आहे. इम्पॅक्ट सबचा नियम सामन्यात एकदा वापरता येतो आणि यात कुठलाही खेळाडू बदलता येतो. म्हणजे गोलंदाजाच्या जागी फलंदाज किंवा फलंदाजाच्या जागी गोलंदाज संघात येऊ शकतो. गरजेप्रमाणे संघाची फलंदाजी तसंच गोलंदाजीतील खोली यामुळे वाढते. पण, त्याचवेळी अष्टपैलू खेळाडूंचं महत्त्व कमी होईल अशी जाणकारांना भीती आहे. (IPL 2025)

वाईड चेंडूंसाठी हॉक – आय : आयपीएलमध्ये नोबॉलसाठी तिसऱ्या पंचांची मदत आधीपासून घेतली जाते. पण, आता वाईड चेंडूचा नियमही बदलण्यात आलाय. त्यासाठी हॉक आय तंत्रज्जानाची मदत घेण्यात येणार आहे. उंचीसाठी दिला जाणारा वाईड आणि ऑफसाईड यासाठी खेळाडू तिसऱ्या पंचाची मदत घेऊ शकतात. (IPL 2025)

(हेही वाचा – IPL 2025, Rajasthan Royals : राजस्थान संघात दुफळी? राहुल द्रविड काय म्हणाला?)

रात्रीच्या वेळी दुसरा नवीन चेंडू वापरायला परवानगी : आयपीएलचे सामने रात्रीच्या वेळी होतात आणि तेव्हा वातावरणात दव असतं. त्यामुळे चेंडू ओला होतो आणि त्याच्यावर पकड बसवणं गोलंदाजांना कठीण जातं. याचा विचार करून आयपीएलने संध्याकाळच्या सामन्यांसाठी दुसऱ्या डावांत नवीन चेंडू वापरण्याची परवानगी दुसरी गोलंदाजी करणाऱ्या संघांना दिली आहे. अर्थात, तशी परवानगी संघांना मैदानावरील पंचांकडून घ्यावी लागे. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.